ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवस
schedule24 Feb 26 person by visibility 55 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी खेडयापाडयातील लिहित्या मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचे काम केले. अफाट वाचनामुळे साहित्याविषयीची त्यांची भूमिका पक्की होती. ते मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार आहेत.’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ.राजन गवस यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या डॉ.म.सु.पाटील समीक्षा पुरस्कार, २०२६ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.विलास शिंदे समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ.गवस पुढे म्हणाले, .
पुरस्कारस उत्तर देताना ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘माणसांवर प्रेम करणाऱ्या समीक्षक म.सु.पाटील यांच्या नांवे दिला जाणारा पुरस्कार मला मिळणे हे गौरवास्पद आहे. नव्याने लिहिणाऱ्यांनी आपला आत्मा गहाण न टाकता समग्र अवकाशाविषयी जागरूकतेने लिहिले पाहिजे.’
कुलसचिव म्हणाले, ‘ पुस्तक परीक्षणाच्या पातळीवरील समीक्षेपेक्षा सैधांतिक पातळीवरील पातळीची समीक्षा चंद्रकांत पाटील यांची आहे. ’ मराठी अधिविभागप्रमुख डॉ.रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.नंदकुमार मोरे यांनी मानपत्राचे वाचन केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ.सुखदेव एकल यांनी आभार. कार्यक्रमासाठी डॉ. दिलीप धोंडगे, प्रा.प्रवीण बांदेकर, कृष्णात खोत, डॉ.एकनाथ पगार, आशुतोष पाटील, विरधवल परब, डॉ.अवनिश पाटील, डॉ.मेघा पानसरे, गौतमीपुत्र कांबळे उपस्थित होते.