मैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्ष
schedule24 Feb 26 person by visibility 50 categoryक्रीडा
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान व संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुर्नबांधकाम चुकीच्या पद्धतीने होत असल्याचा आक्षेप कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने नोंदविला. सरकारने दिलेल्या कोट्यावधी रुपयाच्या निधीतून चुकीचा पद्धतीने काम करून ऐतिहासिक वास्तूचे सौंदर्य नष्ट करीत असल्याबद्दल महापालिका प्रशासनाचा कृती समितीने जाहीर निषेध केला. समितीच्या कार्यकर्त्यांनी या आक्षेपाविषयी महापालिका प्रशासन व हेरिटेज समितीला कळविले होते, तसेच आंदोलनस्थळी उपस्थित राहून तक्रारीसंदर्भात स्पष्टीकरण द्यावे असे पत्र दिले होते. मात्र महापालिकेचे अधिकारी व हेरिटेज समितीचे सदस्यही नाटगृह परिसरात उपस्थित राहिले नाहीत. समितीच्या कार्यकर्त्यांनी खासबाग मैदान व नाटयगृह येथील कामाची पाहणी केली तसेच चुकीचे काम होत असल्याचे निदर्शनास आणले. यावेळी कृती समितीचे अशोक पोवार, रमेश मोरे, विष्णू जोशीलकर राजाभाऊ मालेकर , प्रकाश आमटे, प्रा.शिवाजी पाटील, लहुजी शिंदे, महादेव जाधव, सुनील थोरवत, रवींद्र कांबळे, प्रकाश रांगणेकर, दिलीप सावंत, संदीप लोखंडे, गफूर शेख उपस्थित होते