Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
राज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचनादळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणारमाझी शपथ झाली की तुमची शपथ होणारच...! अजित पवारांच्या आठवणीने मुश्रीफ व्याकुळडॉ. सुनीलकुमार लवटे विचारमंचच्या सभेत वंदे मातरमवर चर्चाएआयच्या माध्यमातून स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रामध्ये मोठी झेप घेता येणे शक्य - प्रफुल्ल खचणे संजय घोडावत आयआयटी - मेडिकल अकॅडमीचे जेईईमध्ये यशज्ञान- कौशल्य - सकारात्मक दृष्टिकोन ही यशाची त्रिसूत्री :  संजय बाबर विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाइतकेच  कौशल्य विकसित करणे हेच राष्ट्राचे खरे बळ - पद्मश्री जी. डी. यादव

जाहिरात

 

दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन

schedule23 Feb 26 person by visibility 59 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन : दळवीज आर्ट इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थी विभागाच्या वार्षिक चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ चित्रकार प्राचार्य जी एस माजगावकर यांच्या हस्ते  झाले. प्रदर्शनात जी डी आर्ट आणि नव्या तीन वर्षाच्या ड्रॉइंग पेंटिंग पदवीकेच्या प्रथम वर्ष, फाउंडेशन या वर्गातील विद्यार्थ्यांच्या निवडक रेखांकन, रंगकाम, संकल्प या मधील पायाभूत सराव चित्र, व्यक्तिचित्र, रचनाचित्र, मुद्राचित्र, शैक्षणिक कलाकृती प्रदर्शित केल्या आहेत. त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षांमधील राज्य कला प्रदर्शनामध्ये निवड झालेल्या कलाकृती  आहेत.

      उद्घाटन सोहळ्याप्रसंगी जेष्ठ चित्रकर्ती श्रीमती विजयमाला मिस्त्री, दळवीज आर्ट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी आमदार बाबासाहेब पाटील, संस्थेच्या सचिव प्राध्यापिका अर्चना आंबीलधोक,  सुनील पाटील (अंबपकर), प्राचार्य अस्मिता जगताप, चित्रकार विजय टिपुगडे,  प्रा. दीपक कांबळे, प्रा.अभिजीत कांबळे, प्रा. प्रवीण वाघमारे, विद्यार्थी विद्यार्थिनी प्रतिनिधी राजवर्धन देशमुख,  स्नेहल खराडे, अभिजात चित्रकलेचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, पालक आणि जाणकार कलारसिक उपस्थित होते. तीन दिवस सुरू असणारे हे प्रदर्शन राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथील कलादालनात  23 ते 25 फेब्रुवारी 2026 अखेर सकाळी ९ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत  कलारसिकांना पाहण्यास खुले राहील.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes