राज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरव
schedule23 Feb 26 person by visibility 220 categoryआरोग्य
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी,कोल्हापूर : आरोग्य विभाग अंतर्गत राज्यातील उत्कृष्ट कार्य केलेल्या परिमंडळ स्तरीय व जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांचा वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात राज्यात राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.हर्षला वेदक यांना सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर व सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.राज्यामध्ये उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरविणाऱ्या संस्था, अधिकारी व कर्मचारी यांचा दरवर्षी शासनामार्फत वंदनीय बाळासाहेब ठाकरे आरोग्यरत्न पुरस्कार व महाआरोग्य सन्मान कार्यक्रमात गौरव सन्मान करण्यात येतो