Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
ज्येष्ठ समीक्षक चंद्रकांत पाटील हे मराठी साहित्याच्या पिकाचे राखणदार - राजन गवसमैदानासह नाट्यगृहाचेही बांधकाम चुकीच्या पद्धतीने, कार्यकर्त्यांनी वेधले लक्षमाझे शहर…माझी जबाबदारी ! एकाचवेळी चार हजार हात स्वच्छतेसाठी सरसावणार !संजय घोडावत यांना द ज्वेल्स ऑफ इंडिया पुरस्कारशक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शनेभाजप उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिकराज्यस्तरीय सोहळयात डॉ. हर्षला वेदक यांचा गौरवनोटीस देऊनही थकबाकी न भरल्यास मिळकतीवर बोजा- महापालिका अधिकाऱ्यांना सूचनादळवीज आर्ट इन्स्टिट्यूटतर्फे वार्षिक चित्रप्रदर्शन शिक्षण हक्क आंदोलनात शैक्षणिक व्यासपीठ, मुख्याध्यापक संघ ताकतीने उतरणार

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात निदर्शने

schedule24 Feb 26 person by visibility 34 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात कोल्हापुरात संघर्ष समितीतर्फे निदर्शने करण्यात आली. ‘जमीन आमच्या हक्काची - नाही कुणाच्या बापाची, शेती वाचवा –शेतकरी वाचवा, शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे’अशा घोषणा देत समितीने  विरोध दर्शविला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने झाली. शक्तीपीठ महामार्ग लादत असल्याचा आरोप करत सरकारचा निषेध केला.  परभणी येथे शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी अत्याचार केला. त्या घटनेचा याप्रसंगी निषेध करण्यात आला. शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा घोषणा देण्यात आल्या. शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा देण्यात आला. याप्रसंगी विजय देवणे,  गिरीश फोंडे, शिवाजी मगदूम, उदय नारकर, दिलीप पवार, सम्राट मोरे,आदींचा समावेश होता. सोमवारी, २३ फेब्रुवारी २०२६ रोजी हे आंदोलन झाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes