भाजप उपाध्यक्षपदी गोपीचंद पडळकर, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्षपदी कृष्णराज महाडिक
schedule24 Feb 26 person by visibility 207 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : यूथ आयकॉन कृष्णराज धनंजय महाडिक यांच्याकडे भारतीय जनता पक्षाने नवी जबाबदारी सोपविली आहे. भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी महाडिक यांची निवड करण्यात आली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी, २४ फेबुवारी २०२६ रोजी नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा झाली. यामध्ये नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्तापदी निवड झाली आहे.
भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी आमदार गोपीचंद पडळकर,माजी खासदार सुजय विखे पाटील, अतुल काळसेकर, भारती पोवार, संजय कोरगे, संजय भेंडे, रामदास कडस, केशव उपाध्ये, प्रिया शिंदे, अर्चना पाटील चाकूरकर अशा दहा जणांची निवड करण्यात आली आहे. भाजप महिला मोर्चा अध्यक्षपदी आमदार चित्रा वाघ तर भाजप ओबीसी मोर्चा अध्यक्षपदी योगेश टिळेकर यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदाची जबाबदारी मिहिर कोटेचा यांच्याकडे सोपविली आहे. भाजप सरचिटणीसपदी निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे, योगेश सागर तर चिटणीसपदी मंगेश चव्हाण, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर,, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रविण घुगे, रेखा कुलकर्णी, भैरवी घाक यांचा समावेश आहे.
भाजपकडून मंगळवारी, २४ फेब्रुवारी २०२६ रोजी मुख्य प्रवक्ता, सरचिटणीस, चिटणीस, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि भाजप युवा मोर्चा अध्यक्ष या पदांसाठी घोषणा झाली. यामध्ये कोल्हापूर राज्यसभेतील खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक यांची भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. कृष्णराज महाडिक हे आंतरराष्ट्रीय कार रेसर आहेत. प्रसिद्ध यूट्यूबर आहेत.सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो.