Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकणण तययगोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळमहापौर चषक फुटबॉल पाच मेपासून ! सोळा संघांचा सहभाग !!शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे विवेकानंद कॉलेजची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायमगोकुळमध्ये रक्तदान शिबिर, ४०० रक्तदात्यांचा सहभाग गोकुळबद्दल सध्या काही बोलणार नाही, पण आमदार शिवाजी पाटलांचे आभार - हसन मुश्रीफांचा खोचक टोलामहावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत यश बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर

जाहिरात

 

विवेकानंद कॉलेजची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायम

schedule02 May 26 person by visibility 59 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापुरातील नामांकित कॉलेज अशी ख्याती असलेल्या विवेकानंद कॉलेजने यंदाही बाराव परीक्षेत विज्ञान, वाणिज्या्र आणि कला शाखेत यशाची परंपरा कायम राखली आहे. विज्ञान शाखेचा शेकडा निकाल 99.27 टक्के लागला.  यामध्ये विज्ञान शाखेत प्रथमेश परमेश्वर काकडे  94.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन करुन अव्वलस्थानी राहिला.   श्रध्दा गणपत सुतार  92.17 टक्के गुण संपादन करीत दुसरी आली.  संचिता नरेंद्र कुलकर्णी 92.00 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला.

            वाणिज्य्‍ (इंग्रजी माध्यम) शाखेचा 92.74 टक्के निकाल लागला. यामध्ये आर्या वरद दीक्षित व अनिष आनंदा संकपाळ यांनी  95.67 टक्के गुण संपादन करुन प्रथम आले.   कु. मनुश्री प्रसन्न शहा  हिने 95.33 टक्के गुण संपादन करुन दुसरी आली तर कु.स्वालीया चौधरी यांनी 93.33 टक्के गुण मिळवून तृतीय आली. वाणिज्य (मराठी माध्यम) मध्ये  सना अल्लाउद्दीन देसाईने 88.67 टक्के  गुण मिळवून प्रथम क्रमांक, साक्षी बाबासो तोरस्करने रणवीर राजाराम अनवटने यांनी 86.00 टक्के गुण मिळवून दुसरा क्रमांक तर स्नेहल गौतम मानेने 84.67 टक्के गुण मिळवून तिसरा  क्रमांक मिळविला.

            कला शाखेचा 87.67 टक्के निकाल लागला. त्यामध्ये आभा भूषण कपाले 87.67 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक संपादन केला, यशोधन नंदकिशोर अनुसे 87.33 टक्के गुण मिळवित दुसरा आला.   संस्कृती राजेंद्र रानगे  84.83 टक्के गुण संपादन करुन विवेकानंद कॉलेजमध्ये तिसरी येण्याचा बहुमान संपादन केला. 100 पैकी 100 गुण संपादन करणारे अकौटन्सी विषयामध्ये तीन विद्यार्थी , कॉमर्स  मॅथ्स् मध्ये 02 विद्यार्थी, सायन्स  मॅथ्स् मध्ये 02 विद्यार्थी तर जिऑलॉजी विषयात 09 विद्यार्थी आहेत. विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील, प्रा एस.एन.साळुंखे, प्रा. एस. एल.पाटील, प्रा वर्षा महाडीक, प्रा भाग्यश्री पाटील,   प्रा विश्वंभर कुलकर्णी , प्रा. सुभाष रानमाळे, प्रा शिल्पा भोसले, प्रा एम आर नवले  यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes