Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकणण तययगोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळमहापौर चषक फुटबॉल पाच मेपासून ! सोळा संघांचा सहभाग !!शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे विवेकानंद कॉलेजची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायमगोकुळमध्ये रक्तदान शिबिर, ४०० रक्तदात्यांचा सहभाग गोकुळबद्दल सध्या काही बोलणार नाही, पण आमदार शिवाजी पाटलांचे आभार - हसन मुश्रीफांचा खोचक टोलामहावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत यश बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर

जाहिरात

 

गोकुळमध्ये रक्तदान शिबिर, ४०० रक्तदात्यांचा सहभाग

schedule02 May 26 person by visibility 125 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये एक मे जागतिक कामगार दिन तसेच महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कॉ. संजय सदलगेकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी महाराष्ट्र राज्यगीत व राष्ट्रगीत सादर करून कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाचा गौरव केला.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ कर्मचारी संघटनेवतीने महालक्ष्मी ब्लड बँक, कागल व कोल्हापूर यांच्या सहकार्याने  रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ४०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

 गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “रक्तदान ही एक जनसेवाच आहे. रक्तदानामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळते. रक्तदान हेच श्रेष्ठदान’ या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून समाजासाठी प्रेरणादायी आहे. 

 या शिबिरात आयटक संलग्न गोकुळ कर्मचारीमार्व्हलस कंपनीटूलेक्स कंपनीकृषी संघलक्ष्मी लाडा कंपनी तसेच एमआयडीसी परिसरातील विविध उद्योगांतील कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. रक्तदात्यांसाठी उत्तम नियोजनवैद्यकीय तपासणीअल्पोपहार व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.

याप्रसंगी गोकुळचे संचालक विश्वास पाटीलअरुण डोंगळेअजित नरके, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटीलकार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक  अनिल चौधरी, बोर्ड  सेक्रेटरी प्रदीप पाटील, व्यवस्थापक प्रशासन रामकृष्ण पाटील, जनरल सेक्रेटरी कॉम्रेड सदाशिव निकम, अध्यक्ष कॉम्रेड मल्हार पाटील, दिलीप पोवार, शंकर पाटील, व्ही.डी.पाटील, लक्ष्मण पाटील, दत्ता बच्चे, संभाजी शेलार, संदेश पाटील, योगेश चव्हाण, कृष्णा चौगले, अजित जाधव उपस्थित होते.   

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes