Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गोकुळच्या इतिहासात गेल्या पाच वर्षात सर्वोत्तम कामगिरी, संचालक मंडळाचे प्रसिद्धीपत्रकणण तययगोकुळवर प्रशासक नियुक्त, पाच अधिकाऱ्यांचे प्रशासक मंडळमहापौर चषक फुटबॉल पाच मेपासून ! सोळा संघांचा सहभाग !!शिक्षक बँकेतर्फे नऊ टक्के व्याजदराने दहा लाख विनाकपात क्लिन कॅश क्रेडिट कर्ज - चेअरमन वर्षा केनवडे विवेकानंद कॉलेजची बारावी परीक्षेत यशाची परंपरा कायमगोकुळमध्ये रक्तदान शिबिर, ४०० रक्तदात्यांचा सहभाग गोकुळबद्दल सध्या काही बोलणार नाही, पण आमदार शिवाजी पाटलांचे आभार - हसन मुश्रीफांचा खोचक टोलामहावीर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे बारावी परीक्षेत यश बारावीत निकालात कोल्हापूर विभागाची घसरण, राज्यात सहाव्या स्थानावर

जाहिरात

 

गोकुळबद्दल सध्या काही बोलणार नाही, पण आमदार शिवाजी पाटलांचे आभार - हसन मुश्रीफांचा खोचक टोला

schedule02 May 26 person by visibility 147 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘गोकुळ दूध संघाबद्दल आज या घडीला काहीही बोलणार नाही. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालादिवशी गुलाल लावूनच सविस्तर प्रतिक्रिया देईन, ’असा सूचक इशारा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांनी आमदार शिवाजी पाटील  करीत असलेल्या टीका आणि आरोपांबाबत विचारले असता दिला.

गेल्या ३५-४० वर्षांच्या सामाजिक आणि राजकीय वाटचालीवरून हसन मुश्रीफ काय आहे, हे सबंध जिल्ह्यासह राज्यालाही माहित आहे. त्यामुळे कोण काय म्हणतय याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले. त्याचवेळी त्यांनी, चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मला  रिकामं केल्याबद्दल मी त्यांचा मनःपूर्वक आभारी आहे. कारण; निवडणुकीमध्ये एकाच पॅनेलमध्ये आम्ही राहिलो असतो तर फार मोठी अडचण होणार होती. ही संभाव्य अडचण त्यांनी स्वतःहूनच दूर केल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. दरम्यान; मुख्यमंत्र्यांना गोकुळमध्ये आम्ही महायुतीचीच सत्ता आणू, असे वचन दिलेले आहे.’ असे मुश्रीफ म्हणाले.
 कागलमध्ये अनौपचारिकरित्या पत्रकारांशी संवाद साधताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, गोरगरिबांची सेवा हाच ध्यास घेऊन मी गेली ४० वर्षे सामाजिक आणि राजकीय वाटचाल करीत आलो आहे. माझे संपूर्ण आयुष्यच उघड्या पुस्तकाप्रमाणे जनतेसमोर आहे. कोण कसा आहे, हे जनता चांगलंच ओळखते. लोक निश्चितच तुलना करून आपला निर्णय घेतील. त्यामुळे, मला अधिक बोलण्याची गरज नाही आणि मी बोलणारही नाही. तसेच; याच जनतेने मला सलग सहावेळा आमदारपदी निवडून दिलेले आहे. परमेश्वराच्या कृपेने त्यापैकी तब्बल २५ वर्षे मंत्रीपद भूषवित आहे. एवढ्या प्रदीर्घ वाटचालीत सबंध कोल्हापूर जिल्ह्यासह उभ्या महाराष्ट्राला हसन मुश्रीफ काय आहे, हे माहित आहे.
  कोल्हापूर शहराच्या पाणीटंचाईकडे लक्ष वेधले असता मुश्रीफ म्हणाले, या आधी पालकमंत्री असताना मी कोल्हापूर शहराच्या प्रश्नांच्या संदर्भात बैठका घेत होतो. परंतु;  अलीकडच्या काळात मी शहराच्या प्रश्नाच्या अनुषंगाने माहिती घेतलेली नाही. परंतु; महायुतीचा घटक म्हणून नक्की लक्ष घालेन. कोल्हापूर शहरात नवीन नियुक्त झालेले आयुक्त राजेंद्र भारूड हे कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. काही दिवसातच महानगरपालिकेच्या सर्व सेवा सुरळीत होतील, याची ते काळजी घेतील.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes