Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
विधान परिषदेसाठी भाजपकडून अकरा उमेदवारांची यादी जाहीर जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम जिल्हा परिषदेत अहिल्यादेवी होळकर जयंती साजरीजयप्रभा स्टुडिओमधून प्रचाराचा शुभारंभ, संग्राम भालकर अपक्ष म्हणून रिंगणात हितैशी समुपदेशन केंद्र समाजासाठी सहाय्यभूत ठरेल – मंत्री चंद्रकांत पाटीलसीआयआय -अ‍ॅग्री इनोव्हेशन समिट उत्साहात,  डीवाय पाटील कृषी - तंत्र विद्यापीठात आयोजन गोकुळसाठी महायुतीच्या नेत्यांचे ठरले ! छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडी जाहीर!!राज्याला आदर्शवत भाडेदराचे रोल मॉडेल तयार करा : आमदार राजेश क्षीरसागरसोशल मीडियावर गोकुळची बदनामी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कर्मचाऱ्यांची मागणी महापालिकेत चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांमधून ७० कर्मचाऱ्यांची मुकादमपदी पदोन्नती

जाहिरात

 

जिल्हा परिषदेच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त विविध उपक्रम

schedule31 May 26 person by visibility 6 categoryजिल्हा परिषद

 

 गाव, सुरक्षित जल-वायूमोहिमेचे आयोजन

जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जिल्हाभर विविध उपक्रम

जागतिक पर्यावरण दिन २०२६ निमित्त जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत तसेच पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या सहकार्याने दि. १ जून ते ५ जून २०२६ या कालावधीत “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” ही विशेष मोहीम ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे. “स्वच्छ गाव, सुरक्षित जलवायू” मोहिमेमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घेऊन पर्यावरण संरक्षण व स्वच्छतेच्या चळवळीला बळ द्यावे, असे आवाहन सौ. शिल्पा शशिकांत खोत, अध्यक्षा, जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी केले आहे.

यावर्षी जागतिक पर्यावरण दिनाची संकल्पना “हवामान कृती” (Climate Action) अशी असून Mission LiFE (Lifestyle for Environment) अंतर्गत पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. या मोहिमेमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, युवक मंडळे, शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग राहणार आहे.

स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनातील 4Rs — Refuse, Reduce, Reuse आणि Recycle तसेच ग्रे-वॉटर व्यवस्थापनातील 3Rs — Reduce, Reuse आणि Recharge या संकल्पनांचा प्रसार करण्यात येणार आहे. “कचऱ्यापासून संपत्ती” (Waste to Wealth), परिपत्र अर्थव्यवस्था (Circular Economy), किचन गार्डन, वृक्षारोपण, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यासारख्या विषयांवर विशेष भर दिला जाणार आहे.

दि. १ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ संदर्भात ग्रामीण भागात जनजागृती करण्यात येणार असून Bulk Waste Generators (BWGs) यांची ओळख, कचऱ्याचे चार प्रकारांमध्ये वर्गीकरण, जुने कचरा डेपो नोंदणी, घराघरातून कचरा संकलन यासंदर्भात विशेष मोहिमा राबविण्यात येतील.

मोहिमेअंतर्गत पुढील उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत :

• घनकचरा व्यवस्थापन नियम २०२६ बाबत  जनजागृती

• ग्रामपंचायत स्तरावरील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी व मूल्यमापन 

• “माझे गाव, माझी जबाबदारी” जनसहभाग उपक्रम 

• मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्या घटकांची (BWGs) ओळख 

• प्रभात फेरी, चित्रकला स्पर्धा, नुक्कड नाटके, स्वच्छता मोहिमा 

• “एक पेड़ माँ के नाम” अंतर्गत वृक्षारोपण अभियान 

• विशेष ग्रामसभा आयोजन ५ जून २०२६ रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विशेष ग्रामसभेमध्ये मोहिमेतील कार्यवाहीचा आढावा घेण्यात येणार असून स्वच्छता, पर्यावरण संवर्धन व हवामान कृतीबाबत ग्रामस्थांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात येणार आहे.

जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत सर्व गट विकास अधिकारी व ग्रामपंचायतींना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सुचना  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन यांनी दिल्या असून, मोहिमेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती SBM(G)-IMIS पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहे.

*बापू गेले…*

schedule02 May 26 person by visibility 104 category

 

मी दीड वर्षांचा असताना बापू मला आत्त्याकडं कोल्हापूरला सोडून गेले. गावात पोर राहिलं तर शहाणं होणार नाही म्हणून हेमंतला कोल्हापूरात ठेवला पाहिजे! जीजी बापूनं ह्रदयावर दगड ठेवला अन् नुकत्याच चालायला आणि बोलायला शिकलेल्या आपल्या पहिल्या अपत्याला आपल्या बहिणीकडं मला सोडलं. का तर याच मोठ्या बहिणीनं बापूंना ही शिकवून शहाणं केलं होतं. बापूंनी मला माईसाहेबांच्या बालमंदीरात प्रवेश मिळवून दिला. पिवळी चड्डी आणि पांढरा शर्ट घालून आत्त्याच्या कडक निगराणीत माझा शहाणं व्हायचा प्रवास चालू झाला. 

दर रविवारी न चुकता कोल्हापूरला यायचं आणि मला शिवाजी चौकातलं इम्पिरियलचं रोझ-व्हॅनिला खाऊ घालून परत आत्याकडं सोडायचं हा बापूंचा परिपाठच! देवाचं फूल चुकलं असेल पण बापू कधी चुकले नाहीत. बापूंची आणि माझी त्यावेळची ओळख म्हणजे मला रविवारी आईसक्रीम देणारा आणि न चुकता माझ्यासाठी मटन घेऊन येणारा माणूस एवढीच मर्यादीत!

काळ सरत गेला. मी तिसरीत असताना आत्त्या पन्हाळ्याला रहायला गेली. मग बापू गाव सोडून जीजी ला घेऊन माझ्या शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. एकत्र कुटुंबातून कुटुंब सोडून किंवा त्यावेळच्या भाषेत घर फोडण्याचा गुन्हा करून माझा बाप ऊभ्या कपड्यानिशी घर सोडून माझ्यासाठी कोल्हापूरात शुक्रवार पेठेत रहायला आला. 

बापूंची एकंदरीत इमेज म्हणजे एकदम शीघ्रकोपी आणि करारी माणूस. गावाकडं सगळी बापूंना फार घाबरायची. बापूंनी सांगीतलं तेच फायनल होतं. मग मी ही तसाच घाबरू लागलो. पर्यायानं बापूंचा आणि माझा संवाद केवळ प्रगतीपुस्तकावरच्या सहीपुरताच मर्यादीत होत गेला. कोल्हापूरला आल्यावर पीयरप्रेशरमुळं मी बापू जीजींना पप्पा आणि मम्मी म्हणून संबोधायला लागलो पण बापू हे बापूच राहीले. फक्त मम्मीचं मात्र ‘ए मम्मे..’ असं कोल्हापूरीकरण होत पुढे ‘आई’ वर येऊन थांबलं. 

बापू कामात बीझी असायचे. मग मला अभ्यासाला बसवण्याच्या महत्प्रयासी कामाची जबाबदारी जीजीवर आली. जीजी चौथी शिकलेली पण अतिशय सुशिक्षित आणि सुजाण बाई! परीक्षेला काय करावं लागतं, तर ‘ऊत्तरं लिहावी लागतात’ एवढं साधं समीकरण मनात ठेवून मी रोज पाच धड्यांखालची प्रश्नोत्तरं लिहूपर्यंत मला जेवायला द्यायचं नाही हा बापूंचा आदेश ह्या धर्मपत्नीनं वर्षानुवर्षे तंतोतंत पाळला. 

प्रगतीपुस्तकाचा प्रश्न सुटला कारण शाळेत पहिला नंबर वगैरे माझ्या अंगवळणी पडू लागला होता. एकदा हिंदीचे सर घरी आले आणि त्यांनी सांगितलं की हेमंत टिळक विद्यापीठाच्या परीक्षेला बसत नाही म्हणतोय कारण वडील नको म्हणतात म्हणून! खोटं बोललो म्हणून बापूंनी अंग सूजूपर्यंत फोकळून काढला. रागातच परीक्षेला बसलो, परीक्षेत पहिला आलो, प्रमाणपत्र दाखवायला गेलो तर जवळ घेऊन कळवळून फक्त एवढंच म्हणाले, ‘भैय्या मार्क महत्वाचे नाहीत रे, फक्त कधी खोटं बोलू नको, त्याची गरज नसते!’

त्या दिवशी बापूंनी मला दोन नियम घालून दिले जे मला आयुष्याला पुरून ऊरलेत; 
पहिला, ‘खोटं बोलायचं नाही’ आणि दुसरा; ‘पहिला नियम कधीही मोडायचा नाही.’ 

पण त्या दिवसानंतर बापूंनी मला कधी ना प्रगतीपुस्तक विचारलं ना अभ्यास कर म्हणून सांगीतलं. ‘हेमंत जेवला का’ हा एकच प्रश्न ते आयुष्यभर आईला विचारत राहीले. 

माझा शैक्षणिक प्रवास माझ्या ऊनाड भानगडींसोबत खाचाखळग्यातून पुढे जात राहिला आणि बापू मात्र काहीही न बोलता ते धक्के पचवत राहिले. मी तरूणाईच्या मस्तीत दुर्लक्ष करत राहिलो. 

डीगरी झाल्यावर डोळ्यासमोर एकदम अंधारी आली. आता पुढं काय; या प्रश्नाला ऊत्तर नव्हतं. मी सगळं सोडून कोल्हापूरात केबल चालवू लागलो. बापूंनी एक दिवस मला सांगीतलं, ‘भैय्या, तू कलेक्टर व्हायच्या लायकीचा पोरगा, का नसते उपद्व्याप करत फिरत असतो? असं काहीतरी कर की जगानं तुला मधुकरचा मुलगा म्हणून न ओळखता मला हेमंतचा बाप म्हणून ओळखावं.’ 

ते शब्द जिव्हारी लागले, 
म्हटलं आता कलेक्टर होऊन दाखवायचंच! 
बॅग ऊचलली आणि थेट मुंबई एसआयएसी गाठलं.. 

युपीएससीला भारतात बावन्नावा आलो म्हणून घरी फोन आला. बापू मटकन खालीच बसले. मी विचारलं, ‘बास का?’ 

माझे दोन्ही हात हातात धरून त्या दिवशी माझा बाप धायमोकलून रडला. ‘बास पोरा, माझं जगणं सार्थक केलंस’ म्हणाला आणि थेट रिकामा डबा घेऊन मटन आणायला बाहेर पडला. 

माझ्यावरचं प्रेम दाखवायची एकच व्यवस्था माझ्या बापाला माहीत होती. मी कोल्हापूरला घरी पोहोचलो की ‘कसा आहेस’ म्हणून कधीही न विचारणारे बापू माझा दंडवत पूर्ण व्हायच्या अगोदर थेट डबा घेऊन मटन आणायला बाहेर. आमच्यातला हाच काय तो सर्वात अर्थपूर्ण संवाद आजतागायत अखंड चालू राहीला. 

कोल्हापूरातले वडील लोक पण अचाट असतात. स्वतःच्या पोराची खुशाली त्याच्या आईमार्फत किंवा फारच झालं तर मित्रांना विचारतात. ‘कसे आहेत तुमचे मित्र? सांगा त्यांना आम्ही विचारलं होतं म्हणून!’ हे कोल्हापूरच्या वडील लोकांचं पक्कं वाक्य. ‘काय रे हेमंत कसं चाललंय तुझं?’ असं थेट विचारणं म्हणजे आपल्याच पोराच्या कर्तृत्वावर जणू शंका घेण्यासारखं वाटत असावं या आबा मंडळींना. दया आणि बंटी नशीबवान म्हणायच्या. बापूंच्या बरोबर तासनतास गप्पा मारत बसायच्या. 

तुमच्याशी गप्पा मारायचं, तुमच्यासोबतही घाबरत घाबरत का होईना पण एखादा चीअर्स करायचं राहूनच गेलं बापू…

अंजलीचं डॅाक्टर असणं, ती आमदार असणं हे त्यांना 
मोठं कौतुकाचं! मल्हार अमेरिकेत अर्थशास्त्र शिकायला गेला म्हणून गावभर छाती फुटूपर्यंत सांगायचे. रखमा दोन महिन्याची असताना तिचं ॲापरेशन चालू होतं तर रखमा बाहेर येऊ पर्यंत ॲापरेशन थिएटरच्या दारात देवाला साकडं घालत एकटाच बसलेला माझा बाप आजही मला तसाच दिसतोय. 

बापूंचं प्रेम, त्यांची कळकळ, त्यांनी खाल्लेल्या खस्ता हे सगळं एका अदृश्य कल्पवृक्षाची फक्त एक अजाणती सावली होती. त्या सावलीत खेळताना झाडाचा किंवा त्याच्या अस्तित्वाचा, आम्हाला त्रास होऊ नये म्हणून झाडानं झेललेल्या असंख्य ऊनपावसाळ्यांचा विचारच कधी मनात आला नाही. वेळ पडली तर त्याच झाडाच्या सुकलेल्या पानांनी आम्हाला शेकोटीची ऊब ही दिली पण जळणाऱ्या पानांची कधी कदरच झाली नाही हो. 

पावसाळ्यात हातकणंगल्याच्या स्टेशनवरून धाकट्याओढ्यातून घरी जाताना माझ्या पायाला चिखल काटे लागतील म्हणून मला खांद्यावर घेऊन स्वतः चिखल काटे तुडवणाऱ्या माझ्या बापाला खांदा द्यावा लागेल हा विचारही मला कधी शिवला नव्हता. बापू रिटायर झाले अन मी आयपीएस झालो. माझ्या रिटायरमेंटला बापूंना घेऊन जायचं माझं स्वप्नं त्यांनी डाव असा अर्ध्यावर मोडल्यानं तसंच राहीलं आता! 

काल रक्षाविसर्जनाच्यावेळी राखेतून त्यांच्या भुगा झालेल्या अस्थी शोधताना अचानक एका भयाण पोकळीची भयंकर जाणीव स्पर्शून गेली. पाहता पाहता ती अंधारी पोकळी माझं अस्तित्वच व्यापून गेली. मी मात्र माझ्यासाठी आयुष्यभर कणकण झिजलेल्या त्या सत्त्याऐंशी वर्षं होरपळलेल्या अस्थींमधे बापूंना शोधायचा केविलवाणा प्रयत्न करत राहिलो. 

बापू, छप्पन्न वर्षांचा मी, कालपर्यंत स्वतःला तरूणच समजायचो ते तुमच्या असण्यामुळं हे मला आज जाणवतंय. स्मशानात मल्हार माझ्या खांद्यावर डोकं ठेवून रडत होता आणि मला मी बाप असल्याची जाणीव करून देत होता. मी आता कुणाच्या खांद्यावर डोकं ठेवून रडायचं हा प्रश्न माझं मन मला विचारत होतं. तुमच्या दुखण्याचा आम्हाला कुणाला त्रास होऊ नये म्हणून संदीप डॅाक्टरच्या प्रयत्नांना ही ओव्हरटेक करून अगदी चालता चालता ठरवून गेल्यासारखे गेला तुम्ही.

वेळ जाईल, काळ जाईल, दुःख आणि शोक हळू हळू विरून जाईल हेच जगरहाटीचं तत्व! पण तुमची ती माझ्या कल्याणाचा सतत ठाव घेणारी करडी नजर मात्र अशीच स्वर्गातूनही माझ्यावर, पोरांवर आणि आम्हासर्वांवर लक्ष ठेवून राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना… 

शब्द सापडायचे बंद झालेत आता. 
राहीला आहे तो फक्त भावनांचा ऊमाळा आणि आठवणी… 
चीअर्स बापू! 
🙏
हेमंत (भैय्या) 

हेमंत निंबाळकर 
*S/o मधुकर निंबाळकर*
कोल्हापूर 
29.4.2026

घघ मयम

schedule31 Mar 26 person by visibility 161 category

[31/03, 10:25] Amit Kit: इनोव्हेटर्स विद्यार्थ्यांना स्टार्टअप्ससाठी सुवर्णसंधी 
केआयटी च्या सहकार्याने मिळणार २-१० लाखाची डीएसटी इग्निशन ग्रांट उपलब्ध.

कोल्हापूर : विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील नाविन्यपूर्ण कल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान (डीएसटी) विभागाकडून इग्निशन ग्रांट योजना राबविण्यात येत आहे. केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (प्रदत्त स्वायत्त ) इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन (आय.आर.एफ.) च्या माध्यमातून या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना, संशोधकांना आणि उद्योजकांना त्यांच्या कल्पनांचे प्रत्यक्ष तंत्रज्ञान, प्रोटोटाइप किंवा स्टार्टअपमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत केली जाते.
“ निवड झालेल्या प्रकल्पांना केवळ आर्थिक मदतच नाही, तर तांत्रिक मार्गदर्शन, व्यवसाय मॉडेल तयार करण्यास मदत, उद्योग तज्ज्ञांचे मार्गदर्शन, बाजारपेठेची माहिती, नेटवर्किंग संधी आणि इन्क्युबेशन सुविधा  ही सर्व मदत उपलब्ध करून दिली जाणार आहे. गेल्या वर्षी दहा स्टार्टअप्सना मिळून रु.५० लाख रुपयांची डिएसटी इग्निशन ग्रँड देण्यात आलेली होती.यावर्षी दर्जेदार स्टार्टअप्सना अधिक रक्कम देण्याचा प्रयत्न असेल.टेक्निकल स्टार्टप्समध्ये काम
[31/03, 10:46] Amit Kit: 🙏*आवाहन*🙏

उद्योजक वाढले तर रोजगार वाढतील. सुरुवातीलाच येणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे अनेक उदयोन्मुख उद्योजक आपल्या कल्पना प्रत्यक्षात आणू शकत नाही. 

त्याचाच विचार करून भारत सरकारने ही योजना केआयटी सारख्या कॉलेजच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचवण्याचा उपक्रम राबवलेला आहे. आपण आपल्या वर्तमानपत्रात वरील बातमी प्रकाशित करून आपल्या परिसरातील इनोव्हेटिव्ह तरुणाईपर्यंत ही बातमी पोहोचवावी करून त्यांच्या कल्पनांना पंखही मिळतील आणि पैसेही.

ङघ ययय

schedule29 Jan 26 person by visibility 308 category

*संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत दैदीप्यमान यश*

कोल्हापूर प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ जानेवारी २०२६ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा १८५ सें.मी. व त्यापेक्षा अधिक उंचीच्या गटात घेण्यात आली असून, अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धीरज होळकुंदे याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले.

या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना धिरज होळकुंदे म्हणाला की, “संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील अत्याधुनिक जिम सुविधा, तसेच जिममधील मार्गदर्शक सचिन बागडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मला सतत प्रेरणा देत राहिले. याशिवाय माझे आई-वडील आणि मित्रपरिवार यांचे अमूल्य सहकार्य व पाठबळ यामुळेच हे यश मिळवणे शक्य झाले.”

धिरज होळकुंदे यांच्या या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, विभाग प्रमुख प्रा. वंदना शहा, क्रीडा समन्वयक प्रा. संदीप पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संजय घोडावत इन्स्टिट्यूट सदैव प्रोत्साहन देत असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

ठठ बबब

schedule06 Oct 25 person by visibility 555 category

*बातमीपत्र*

*व्यापारी-उद्योजकांच्या असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून पाठपुरावा करणार- रवींद्र माणगांवे*

*कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*

 

कोल्हापूर दि. ६: व्यापारी-उद्योजकांच्या असणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक होईपर्यंत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून पाठपुरावा करणार असल्याचे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर, मुंबईचे नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र माणगांवे यांनी प्रतिपादन केले. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेस प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, व्यापारी-उद्योजकांना व्यवसाय करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पण त्या अडचणींमध्ये संधी शोधून आपला व्यवसाय टिकवून ठेवावा. वीज दरवाढीचे मोठे संकट व्यापारी-उद्योजकांसमोर आ वासून उभे आहे. वीज नियामक आयोगाने आपल्याच आदेशाला स्थगिती दिल्याने जुनाच आदेश कायम राहण्यासाठी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून संघटीतपणे लढा लढूया. कोल्हापुरी चप्पल बाबत महाराष्ट्र चेंबरने सर्वप्रथम प्रश्न उचलून धरला होता. त्यावर ब्लॉक अँड चेन ही व्यवस्था अभ्यास करुन कोल्हापूरात क्लस्टर होणेसाठी चर्चा करेल असे सांगितले. फूड सेफ्टी कायद्यानुसार उत्पादनांचे नमुने तपासणीसाठी आवश्यक असणारी NABL लॅब कोल्हापूर- सांगली परिसरात होणेसाठी आपण प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. त्याबाबत संबंधीत मंत्र्यांशी लवकरच चर्चा करणार आहे. व्यवसाय कर व मार्केट सेस रद्द होणेसाठी प्रयत्नशील असल्याची ग्वाही दिली. केंद्र शासनाने जीएसटी 2.0 लागू केल्याने वस्तूंच्या किंमती कमी झाल्याने त्याचा फायदा ग्राहकांसोबतच व्यापारी-उद्योजकांनाही होणार आहे. व्यापारी-उद्योजकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून २ दिवसांत उद्योगमंत्री उदय सामंत व पुढील आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेऊन जरुर ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. 

कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी अहवाल सालात केलेल्या कार्याचा सविस्तर आढावा वार्षिक सभेत सांगितला. त्यानंतर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या स्वागतपर भाषणात वीज दरवाढ, परवाना धारकांच्या भाड्याचा प्रश्न, फूड सेफ्टी कायद्यानुसार कराव्या लागणाऱ्या तपासणी लॅब कोल्हापूरात होणेसाठी तसेच केवळ महाराष्ट्रात वसूल केला जाणारा व्यवसाय कर व मार्केट सेस कमी करणेसाठी महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून प्रयत्न करण्याची विनंती केली. 

महाराष्ट्र चेंबरच्या नवनिर्वाचित अध्यक्षपदी निवड झालेबद्दल रवींद्र माणगांवे यांचा कोल्हापूर चेंबरचे माजी अध्यक्ष प्रदीपभाई कापडिया व आनंद माने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

माजी आमदार व संचालिका जयश्री जाधव, माजी आमदार प्रदीपभाई कापडिया, माजी अध्यक्ष आनंद माने यांनी मनोगते व्यक्त केली.

यावेळी भरत ओसवाल, लक्ष्मण पटेल, सुभाष जाधव, अभिजित डुबल यांनी वेगवेगळ्या पदांवर मिळविलेल्या नोवलौकीबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष रमाकांत मालू, कोल्हापूर चेंबरचे उपाध्यक्ष व स्मॅक चे अध्यक्ष राजू पाटील, वैभव सावर्डेकर, जयेश ओसवाल, अजित कोठारी, राहुल नष्टे, संपत पाटील, अनिल धडाम, दिलीप मोहिते, प्रकाश केसरकर, शिवराज जगदाळे, इंजिनिअरिंग असोसिएशनचे व्हाईस चेअरमन श्रीकांत दुधाणे, गोशिमाचे अध्यक्ष सुनिल शेळके, मॅकचे अध्यक्ष मोहन कुशिरे व सभासद मोठ्या संख्यने उपस्थित होते.

उपाध्यक्ष धनंजय दुग्गे यांनी सर्व सभासदांचे स्वागत केले. आभार मानद सचिव प्रशांत शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन सीमा जोशी यांनी केले.

ठठ थथथ

schedule16 Sep 25 person by visibility 624 category

प्रेस नोट

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार "स्वस्थ नारी सशक्त परिवार" या अभियानात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यात सर्व ठिकाणी २० प्रकारचे उपक्रम

कोल्हापूर, १५ सप्टेंबर २०२५

मा. प्रकाश आबिटकर, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री कोल्हापूर जिल्हा यांच्या मार्गदर्शना खाली कोल्हापूर जिल्हया मध्ये "स्वस्थ नारी सशक्त परिवार" या अभियानात दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी ८१ आरोग्य वर्धीनो केंद्र, नगरपालिका सर्व आरोग्य नागरी केंद्रे व ४१३ उपकेंद्र ठिकाणी २० प्रकारचे उपक्रम दिनांक १७सप्टेंबर २०२५ रोजी पासुन मोहिम सुरू करण्यात येणार आहे.

'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियाना अंतर्गत जिल्ह्यातील महिलांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता वाढवण्यासाठी आणि आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी यांच्यामार्पन्त १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान हे विशेष अभियान देशभरात राबविण्यात येत आहे. महिलांच्या आरोग्य तपासणीसह उपचार व आवश्यक संदर्भ सेवा व समुपदेशन करण्यात येणार आहे. विशेषतः सर्व माता व मुली, महिलांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे व मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन यांनी केले आहे.

या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या आरोग्याविषयी शिक्षित करणे, जागृत करणे आणि त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणेत आले आहे. या शिबिरांमध्ये महिलांच्या स्तन आणि गर्भाशयाच्या कॅन्सर निदान. यामध्ये विशेषतज्ज्ञ यांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्र यामध्ये सदरील शिबिर घेण्यात येणार आहेत यसाठी सर्व आरोग्य यंत्रणा सज्ज असून या अभियानात जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्र सहभागी होणार आहेत. या अभियानामुळे महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याविषयी प्रोत्साहन मिळेल आणि गंभीर आजारांचे लवकर निदान होऊन योग्य वेळी उपचार सुरू करण्यास मदत होईल, यामुळे स्वस्थ नारी, सशक्त परिवार हे उद्दिष्ट साध्य होण्यास मदत होईल.

अभियानातील उपक्रम

सर्व महिलांसाठी तपासणी आणि आरोग्य सेवा

१. रक्तदाब, मधुमेह, नेत्र, दंत रोग तपासणी

२. स्तन व गर्भाशय मुख व मुख कर्करोग तपासणी
3. ३. गरोदर महिलांसाठी प्रसूतीपूर्व तपासणी

४. लसीकरण सेवा, रक्त व हिमोग्लोबिन तपासणी

५. क्षयरोग तपासणी

६. सिकसेल आजार व रक्तक्षय तपासणी

७. विशेष तज्ञांचा सल्ला व मार्गदर्शन निरोगी जीवनशैली आणि पोषण निरोगी जीवनशैली आणि पोषण

८. स्थानिक व क्षेत्रीय आहाराला प्रोत्साहन देणे.

९. गरोदर आणि स्तनदा मातांसाठी तसेच लहान बाळांसाठी योग्य आहार.

१०. मासिक पाळी स्वच्छता व पोषण

११. टेक-होम राशन (THR) चे वितरण

१२. आरोग्य सेवा घेणे सोपे करण्यासाठी

१३. माता व बालसुरक्षा (एमसीपी) कार्ड

१४. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना नोंदणी

१५. आयुष्मान वय वंदना कार्ड

१६. सिकल सेल कार्ड

१७. पोषण ट्रॅकर मध्ये लाभार्थी नोंदणीनागरिकांचा सक्रिय सहभाग नागरीकांचा सर्कीय सहभाग

१८. रक्तदान शिबीर

१९. निक्षय मित्र स्वयंसेवक नोंदणी

२०. अवयवदान नोंदणी

या अभियानामध्ये प्रत्येक कुटुंबाने आपल्या घरातील सर्व महिला व माता यांना तपासणीसाठी सक्रियपणे सहभाग घेण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आबाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेएन, उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर डॉ. दिलीप माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द पिंपळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांनी केले आहे

(डॉ. अनिरुध्द पिंपळे)

जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद कोल्हापूर

णणजझ त

schedule31 May 25 person by visibility 908 category

संजय घोडावत विद्यापीठातील ओंकार पडळकरचे क्रीडा स्पर्धेत यश

schedule18 Apr 25 person by visibility 987 category

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: संजय घोडावत विद्यापीठाचा विद्यार्थी ओंकार पडळकर याने ऑल इंडिया इंटर-युनिव्हर्सिटी बेस्ट फिजिक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून विद्यापीठाचा गौरव वाढवला आहे. तसेच, त्याने आय एफ बी बी युनिव्हर्सिटी २०२४ हा प्रतिष्ठेचा किताब जिंकत आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप निर्माण केली आहे.

या यशाबद्दल विद्यापीठाचे  विश्वस्त  विनायक भोसले,  कुलगुरू डॉ. उद्धव भोसले,  कुलसचिव डॉ. विवेक कायंदे,  क्रीडा अधिकारी  सुर्यजीत घोरपडे यांनी ओंकारचे अभिनंदन केले. या यशामध्ये विद्यापीठाचे चेअरमन  संजयजी घोडावत यांचे  प्रोत्साहन आणि मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले आहे. ओंकारच्या या मेहनती आणि कौशल्यामुळे त्याची निवड २०२५ मध्ये होणाऱ्या
अर्नोल्ड क्लासिस स्पर्धेसाठी झाली आहे.

अभाविप

schedule23 Dec 22 person by visibility 1269 category


कोल्हापूर :  "जेथे जेथे विद्यार्थी आहे, तिथे तिथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद कार्यरत असेल" असा विश्वास अभाविपचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशच्या तीन दिवसीय अधिवेशनाला शुक्रवारी सुरुवात झाली. 
 अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (२३ डिसेंबर) प्रदेश अध्यक्ष व प्रदेश मंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. अध्यक्षीय मनोगत मांडत असताना प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते यांनी गेल्या वर्षभरात केलेल्या विद्यार्थी परिषदेच्या कार्यांची माहिती उपस्थितांना सांगितली. अभाविपचे अमृत महोत्सवी वर्ष आपण सर्वजण अतिशय उत्साहाने साजरा करीत आहोत.     अनिल ठोंबरे म्हणाले, " बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली अशा छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व संघर्षाच्या लढ्याच्या प्रतिनिधित्वाची साक्ष देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात  ५७ वे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन होत आहे " याचा मला विशेष आनंद असल्याचे प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी सांगितले.
या अधिवेशनात वर्ष २०२२ - २०२३ ची नविन कार्यकारिणी घोषित करण्यात येणार आहे. आज या नविन वर्षासाठी पुननिर्वाचित घोषित झालेल्या प्रदेश अध्यक्ष प्रा. निर्भयकुमार विसपुते व प्रदेश मंत्री अनिल ठोंबरे यांनी त्यांचा पदभार स्विकारला. 
 
G20 : विश्वपटल पर भारत या विषयावर अभाविप चे क्षेत्रीय सहसंघटन मंत्री राय सिंह यांनी सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले. भारताच्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सुरू आहे. तर पुढील अमृत काळामध्ये तरूणांची भुमिका ही महत्वाची राहणार आहे. असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. येत्या काही वर्षांत भारतात देशा बाहेरून शिकायला येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, हाच दूर दृष्टीकोन ठेवून विद्यार्थी परिषदेने वर्ल्ड ऑर्गनायझेशन ऑफ स्टुडंट्स अँड युथ या गतिविधी ची स्थापना केली होती. मी, माझ गाव, माझ शहर इतकाच विचार न करता जागतिक पातळीवरचा विचार करण्याची गरज आहे असे आवाहन त्यांनी तरूणांना केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes