Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाईडॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटची  शंभर टक्के निकालाची परंपरा कायमब्राह्मण सभा करवीरतर्फे ग्रंथदिंडी, ४० वारकरी बालचमूंचा सहभागरोटरी सेंट्रलच्या अध्यक्षपदी डॉ. भूषण शेंडगे, सचिवपदी अविनाश चिकनीसअमित शहांच्या सभेत संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणा, एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी काढले बाहेरभारत म्हणजे धर्मशाळा नव्हे, एक- एक घुसखोर शोधून देशाबाहेर घालवू - अमित शाहअंबाबाई मंदिर विकास आराखडयामुळे धार्मिक पर्यटनासह स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळशहरात २२ जूनपासून एक दिवसाआड पाणीपुरवठाटीईटीसाठी कोल्हापूर केंद्रावर उच्चांकी परीक्षार्थी, नागमोडी बैठक व्यवस्थाशिवसेनेच्या वर्धापनदिनानिमित्त कोल्हापुरात जल्लोष; शिवाजी चौकात जिलेबी वाटप

जाहिरात

 

महापौर चषक फुटबॉल पाच मेपासून ! सोळा संघांचा सहभाग !!

schedule04 May 26 person by visibility 303 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेतर्फे पाच ते 17 मे 2026 या कालावधीत महापौर चषक फुटबॉल स्पर्धा आयोजित केली आहे. मंगळवारी पाच मे रोजी सायंकाळी चार वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध सुभाष नगर फुटबॉल क्लब यांच्यामध्ये उद्घाटनचा सामना होणार आहे या स्पर्धेमध्ये 16 नामांकित संघ सहभागी आहेत अशी माहिती महापौर रूपाराणी  निकम यांनी दिली.  या स्पर्धेतील विजेत्या संघास एक लाख पन्नास हजार रुपये व चषक,  उपविजेत्या संघास 75 हजार रुपये व चषक असे बक्षीसाचे स्वरूप आहे. याशिवाय उत्कृष्ट गोलकीपर, डिफेन्स, हाफ, फॉरवर्ड खेळाडूस प्रत्येकी दहा हजार रुपये व चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडला वीस हजार रुपये व चषक असे बक्षीस आहे. स्पर्धेतील पहिल्या फेरीत बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी 10 हजार रुपये व दुसऱ्या फेरीत बाद होणाऱ्या संघास प्रत्येकी 20000 रुपये बक्षीस येणार आहेत. उपांत्य सामन्यात पराभूत दोन संघास वीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.शिवाय प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू ट्रॅक सूट बक्षीस आहे
17 मे रोजी स्पर्धेतील अंतिम सामना व बक्षीस समारंभ आहे. तर 16 मे रोजी दोन प्रदर्शनीय सामने होणार आहेत. प्रदर्शित सामन्यांमध्ये पहिला सामना कोल्हापूर पोलीस संघ आणि कोल्हापूर महानगरपालिका संघ यांच्यामध्ये होणार आहे तर दुसरा प्रदर्शनीय सामना हा लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यामध्ये होणार आहेत.
 पत्रकार परिषदेला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला व बालकल्याण समिती सभापती कौसर बागवान, नगरसेवक विजय खाडे,अशकिन आजरेकर, नगरसेविका माधुरी नकाते, मंगल साळोखे, माधुरी हटकर, सृष्टी जाधव, उपायुक्त किरणकुमार धनवडे आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes