Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनग्रामपंचायतीकडूनच अपार्टमेंटमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन ! राजू मानेंचा आरोप,  आंदोलनाचा दिला इशारा !!गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेटजिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणीनरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकरजुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड

जाहिरात

 

ग्रामपंचायतीकडूनच अपार्टमेंटमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन ! राजू मानेंचा आरोप,  आंदोलनाचा दिला इशारा !!

schedule27 Aug 26 person by visibility 168 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील पुष्पनिल अपार्टमेंटमध्ये ग्रामपंचायतीने सोळा अनधिकृत नळ कनेक्शन दिला आहे. या कनेक्शनसाठी कोणत्याही स्वरुपात अनामत रक्कम, पाणी बिल, पावती किंवा नमुना आठवर नोंद नाही यामुळे ग्रामपंचायतीचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे. असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजू माने यांनी केला. त्यांच्यासह नागरिकांनी, ग्रामविकास अधिकारी महेश खाडे यांना निवेदन देत दहा दिवसात कार्यवाही न झाल्यास आंदोलन केले जाईल. तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषदेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करू असा इशारा दिला. चार मजली इमारतींमध्ये सोळा फ्लॅट आहेत. मात्र अनधिकृत नळ कनेक्शन जोडले आहेत. नळ कनेक्शनचे सोळा पाइप झाडीत लपवले असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. सामाजिक कार्यकर्ते माने, चंद्रकांत पंडित, पोपट नाईक, सतीश मांगले, स्मित पाटील, तानाजी चव्हाण, दिनकर जाधव, रुपेश घडशी, गजानन सपकाळ, अशोक लांडगे, सूरज पंतोजी, विनायक बागणे, प्रदीप दुगाणी यांच्या सह्यानिशी निवेदन दिले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes