Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठाशिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

जाहिरात

 

डॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडी

schedule27 Aug 26 person by visibility 238 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : प्रथितयश होमिओपॅथ व शासकीय होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय कागलचे प्रभारी प्राचार्य डॉ. रोझारिओ पास्कल डिसोझा यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत मटेरिआ मेडीका विषयात पीएचडी बहाल करण्यात आली. २०२७ मध्ये नाशिक येथे होणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात त्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे.
जगद्गुरू पंचाचार्य एज्युकेशन सोसायटीच्या होमिओपॅथिक वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय कोल्हापूर या आरोग्य विद्यापीठ मान्यता प्राप्त संशोधन केंद्रामधून आरोग्य विद्यापीठाच्या होमिओपॅथी विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. राजकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “इफीकसी ऑफ बरबेरीस इन द मॅनेजमेंट ऑफ नेफ्रोलीथीॲसीस" या विषयावर डॉ. रोझारिओ डिसोझा यांनी प्रबंध सादर केला. तसेच त्यांचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमधून संशोधनपर लेख  प्रसिध्द  आहेत. संशोधन कार्यात त्यांना महाविद्यालयातील प्रा. डॉ. एम. आर. कुलकर्णी, डॉ. सुजाता कामिरे, डॉ. सुनेत्रा शिराळे, डॉ. सचिन मगदूम, डॉ. शिवानी पाटील आदींचे सहकार्य लाभले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes