Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीत रंगल्या राजकीय कोट्या, मनातील सल अन् सभापतिपदासाठी वाट पाहण्याची ईच्छा‘कोल्हापूरचे महापौर’पुस्तकाच्या तिसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन दिमाखातप्रल्हाद चव्हाणांनी स्वहिताची नव्हे तर समाजहिताची भूमिका अंगिकारुन आयुष्यभर कार्य केले- पालकमंत्री प्रकाश आबिटकरपुणे शिक्षक मतदारसंघासाठी टीडीएफकडून  कौस्तुभ गावडे यांची  उमेदवारी जाहीरकोल्हापूर बाजार समितीच्या सभापतिपदी प्रा. शेखर देसाई, उपसभापतिपदी पांडूरंग काशीदकोल्हापूर शहरात 31 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणीपुरवठाशिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलन

जाहिरात

 

जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणी

schedule27 Aug 26 person by visibility 3757 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : जिल्हा परिषदेमधील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीचे पत्र जिल्हा परिषद सदस्यांनी, अध्यक्षा शिल्पा शशिकांत खोत यांच्याकडे दिले.या संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जास्मिन यांचीही भेट घेतली जाणार असल्याचे सदस्यांनी म्हटले.
 जिल्हा परिषद सदस्य शिवाजी  जाधव,अतिश  शिंगे, इंद्रजीत पाटील, क्रांतिसिंह पवार -पाटील, आणि राहुल आवळे यांनी गुरुवारी, (27 ऑगस्ट 2026) अध्यक्षा खोत यांची भेट घेतली. 'गेले २२ वर्षे जिल्हा परिषदेत अतिशय भक्तीभावाने सुरू असलेली गणेशोत्सवाची परंपरा कोणत्याही परिस्थितीत खंडित होवू देणार नाही. वेळप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य मिळून गणेश चतुर्थी दिवशी गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना करणार आहोत.' असे सदस्य शिवाजी जाधव यांनी स्पष्ट केले. निवेदनात म्हटले आहे,' जिल्हा परिषदेत 2004 पासून अत्यंत उत्साहात व मांगल्यपूर्ण वातावरणात गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात येते. परंतु यंदा कोणाच्यातरी तक्रारीवरून गेली बावीस वर्षे अखंडपणे सुरू असलेला गणेशोत्सव रद्द करायला निर्णय झाल्याचे समजते. मुळातच हा निर्णय खेदजनक आहे. सांस्कृतिक परंपरेचा सन्मान ठेवून राज्य उत्सव या नात्याने प्रशासकीय स्तरावर उत्सवाला चालना मिळणे आवश्यक आहे. तरी यंदाचा जिल्हा परिषदेतील गणेशोत्सव  रद्द न करता भक्तमय निवातावरणात साजरा करण्याचा निर्णय घ्यावा.' असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes