Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
जुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड शिक्षकांचा एकच निर्धार, कौस्तुभ गावडेंना आमदार करुन विधानपरिषदेत पाठविणारराज्यभरातील व्यापार -व्यावसायिकांच्या प्रतिनिधींची पणनमंत्र्यांच्यासोबत चर्चा ! बाजार समिती पदाधिकारी व्यापाऱ्यांची लवकरच संयुक्त बैठक!!वीज कामगारांचे हाल करण्यासाठी मेस्माची चाल सरकारने वापरली का? कामगार संघटनेचा सवालसांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे २९ ते ३१ ऑगस्टदरम्यान जयसिंगपुरात लोकनृत्य महोत्सवबाजार समिती पदाधिकारी निवडी शुक्रवारी ! सभापतिपदी शेखर देसाई की मेघा राजेंद्र देसाई ! !करवीर-हातकणंगले शिक्षक पतसंस्थेचे कार्य कौतुकास्पद : आमदार अमल महाडिकआश्वासन नको – आता ठोस निर्णय हवा, भारतीय मजदूर संघातर्फे आंदोलनउचगावच्या सर्वागिण विकासासाठी  एक कोटी रुपयांचा निधी देणार - खासदार धनंजय महाडिक

जाहिरात

 

जुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन

schedule27 Aug 26 person by visibility 46 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी :  २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीची राज्यस्तरीय बैठक बुधवारी २६ ऑगस्ट 2026  रोजी साधना विद्यालय, हडपसर, पुणे येथे झाली.बैठकीत प्रत्येक जिल्ह्याच्या प्रतिनिधींनी आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. शासनाला अंतिम संधी देत १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत काळ्या फिती लावून शालेय कामकाज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 5 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे

राज्यातील विविध जिल्ह्यांमधून आलेल्या प्रतिनिधींनी बैठकीत सहभाग घेतला.  आंदोलनाची अंतिम दिशा निश्चित करण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले होते. सरकारने २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ठोस निर्णय घेतला नाही, तर दि. २८ सप्टेंबर २०२६ पासून आझाद मैदान, मुंबई येथे सहकुटुंब आंदोलन व आमरण उपोषण करण्याचा इशारा बैठकीत देण्यात आला.

“जुनी पेन्शन लागू करा, अन्यथा इच्छा मरणाची परवानगी द्या,” अशी टोकाची भूमिका घेण्याची वेळ  कर्मचाऱ्यांवर आणू नये, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. राज्यातील २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. अशी माहिती कार्याध्यक्ष बाबा पाटील यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes