भरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड
schedule26 Aug 26 person by visibility 45 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन 'स्मॅक'चे उपाध्यक्ष भरत परशुराम जाधव यांची महाराष्ट्रातील उद्योग, व्यापार आणि आर्थिक विकासासाठी कार्यरत असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर मुंबईच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली . या निवडीबद्दलचे पत्र व पुष्पगुच्छ देऊन जाधव यांचे अभिनंदन करण्यात आले. कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष व महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष संजय शेटे, कोल्हापूर चेंबरचे संचालक दीपक जाधव, महाराष्ट्र चेंबरचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्रशांत शिंदे व धनंजय दुग्गे याने जाधव यांचे अभिनंदन केले
स्मॅकचे संचालक राजू पाटील यांची यापूर्वीच पश्चिम महाराष्ट्र विभागीय गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी निवड झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र चेंबरच्या विविध स्तरांवर 'स्मॅक'चा वाढता सहभाग आणि प्रतिनिधित्व ही कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्रासाठी निश्चितच अभिमानाची बाब ठरत आहे.या निवडीसाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष रवींद्र माणगावे यांचे सहकार्य लाभले.