Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनग्रामपंचायतीकडूनच अपार्टमेंटमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन ! राजू मानेंचा आरोप,  आंदोलनाचा दिला इशारा !!गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेटजिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणीनरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकरजुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड

जाहिरात

 

गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेट

schedule27 Aug 26 person by visibility 207 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीसाठी नेते मंडळींनी जोडण्या करण्यास सुरुवात केली आहे. अधिकाधिक ठरावधारक सभासदापर्यंत पोहोचण्यासाठी पायाला भिंगरी बांधासारखे नेतेमंडळी व संचालक फिरत आहेत. दरम्यान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी 27 ऑगस्ट रोजी चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी आमदार शिवाजी पाटील यांनी आमदार सतेज पाटील यांचा शाल व मूर्ती देऊन सत्कार केला. आमदार पाटील यांनी 25 ऑगस्ट रोजी हातकणगले ग्रामीण भाजपचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी भेट दिली होती त्यानंतर दोन दिवसात त्यांनी थेट भाजपचे आमदार शिवाजी पाटील यांची भेट घेऊन आगामी गोकुळ निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा केली. याप्रसंगी गोपाळराव पाटील, राहुल देसाई, विद्याधर गुरंबे, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते.
 महायुतीतील नेते मंडळींनी गोकुळची निवडणूक एकत्रित लढवू असे यापूर्वीच जाहीर केले आहे. दरम्यान काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा संपर्कदौरा सुरू केला आहे. रोज एका तालुक्याचा ते दौरा करत आहेत. गुरुवारी ते चंदगड दौऱ्यावर होते. त्यांनी, आमदार शिवाजी पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली. इनाम सावर्डे येथे ही भेट झाली. आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावरही त्यांनी टीकास्त्र सोडले होते. महिना -दीड महिन्यापूर्वी आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळच्या निवडणुकीच्या अनुषंगाने बोलताना काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आम्हाला फार लांबचे नाहीत असे विधान केले होते. तसेच त्यांनी गोकुळच्या निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निर्णय हा आपल्यासाठी अंतिम असेल असेही स्पष्ट केले होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes