Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शिक्षण समितीने मागवली प्रशासक कालावधीतील शिक्षण विभागाच्या कामकाजाची माहितीडॉ. रोझारिओ डिसोझा यांना आरोग्य विद्यापीठाची पीएचडीपद्मश्री प्रभाकर कोरेंचा शरद पवारांच्या हस्ते तीन सप्टेंबरला पुण्यात सत्कारअन्यायकारक संचमान्यतेच्या धोरणाविरोधात सोमवारी शिक्षण उपसंचालक कार्यालयाला टाळे ठोक आंदोलनग्रामपंचायतीकडूनच अपार्टमेंटमध्ये अनधिकृत नळ कनेक्शन ! राजू मानेंचा आरोप,  आंदोलनाचा दिला इशारा !!गोकुळ निवडणूक- सतेज पाटलांचा धडाका, भाजप आमदारांच्या निवासस्थानी भेटजिल्हा परिषदेतील गणेशोत्सव रद्द करण्याचा निर्णय मागे घ्यावा - सदस्यांची अध्यक्षांच्याकडे मागणीनरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकरजुनी पेन्शनसाठी एक सप्टेंबरपासून शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलनभरत जाधव यांची महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणीवर निवड

जाहिरात

 

नरेंद्र मोदी विचारमंचच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी पूनम तोडकर

schedule27 Aug 26 person by visibility 79 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : नरेंद्र मोदी विचार मंचच्या पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी पूनम तोडकर यांची निवड करण्यात आली आहे. या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात संघटना अधिक मजबूत करण्यासोबतच महिला युवकांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करणार असल्याचा निर्धार तोडकर यांनी व्यक्त केला. तोडकर या गेली अनेक  वर्षे सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. महिला बचत गट सक्षमीकरण, सरकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे यासाठी त्या काम करत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध लोककलंकारी योजनांची माहिती तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवून पात्र लाभार्थ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी आपण विशेष मार्गदर्शन सत्र आयोजित करणार आहोत असे त्यांनी सांगितले याशिवाय रक्तदान शिबिरे आरोग्य तपासणी शिबिरे शैक्षणिक उपक्रम महिला व युवकासाठी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केले जातील असेही त्या म्हणाल्या जनतेशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी सोडवणुकीला  प्राधान्यक्रम राहील असे त्या म्हणाल्या. पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्या पत्रकारांशी बोलत होते. याप्रसंगी शुभांगी गुरव उपस्थित होत्या.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes