Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर ! एक ते १९ प्रभाग चार सदस्यीय, वीस क्रमांकाच्या प्रभागात पाच नगरसेवक !!माजी सैनिक पत्नीसह गिरविणार दूरशिक्षणाचे धडे संयुक्त न्यू शाहूपुरीतर्फे एकत्रित मिरवणूकअमल महाडिकांनी केली पाचगाव केंद्र शाळेची पाहणीओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलनकसबा बीड महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजराआरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे, एनएचएमचे कर्मचारी समायोजनासाठी दहा दिवस रस्त्यावरगणेशोत्सवातील कामांना शिक्षकांचा विरोध, सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचाच जयजयकार, साडेतीन लाखाहून अधिक मूर्ती संकलितसाऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार   

जाहिरात

 

आरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे, एनएचएमचे कर्मचारी समायोजनासाठी दहा दिवस रस्त्यावर

schedule03 Sep 25 person by visibility 346 category

 महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : आरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे आहेत. दरम्यान राष्ट्रीय आरोग्य अभियानातील आरोग्य कर्मचारी मात्र समायोजनासाठी गेले दहा दिवस रस्त्यावर आहेत. समायोजन प्रक्रियेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर करावा यासाठी  ते 25 ऑगस्टपासून कामबंद आंदोलन पुकारत  जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मारला आहे. सरकार त्यांच्या प्रश्नाकडे कधी लक्ष देणार आणि ते समायोजित कधी होणार असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित केला जात आहे.
 राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी कर्मचारी एकत्रिकरण समिती महाराष्ट्राच्या नेतृत्वाखाली  आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यामध्ये जवळपास 900 कर्मचारी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहेत. दहा वर्षे पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांचे 100 टक्के समायोजन व प्रत्येक वर्षी 30 टक्के प्रमाणे सार्वजनिक आरोग्यविभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभा,  वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागामध्ये समायोजन करणे यासह 20 प्रमुख मागण्या आहेत. एकच नारा समायोजन करा अशा घोषणा देत त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन पुकारले आहे. तीन वर्षे व पाच वर्षे सेवा पूर्ण झालेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना रॉयल्टी बोनस  लागू करावा अशी मागणी ही त्यांनी केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रिकरण समितीचे राज्य समन्वयक स्वप्निल गोसावी, संजय पाटील, दिलीप जाधव, सुरेखा कुडचे, स्मिता खंदारे, विशाल मिरजकर, जयदीप सावडकर आधी आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत जिल्हाभरातील 800 हून अधिक कर्मचारी या आंदोलनात सहभागी आहेत.
आमदार विनय कोरे याने आंदोलनस्थळी भेट देऊन कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात चर्चा केली. तसेच त्यांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. दुसरीकडे सरकारने आमच्या मागण्याची दखल घेऊन ठोस आश्वासन द्यावे आणि समायोजन प्रक्रियेचा कालबद्द कार्यक्रम जाहीर करावा तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असा इशारा राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रिकरण समितीने दिला आहे. आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक आमदारांना कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन सादर केले जाणार आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes