Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर ! एक ते १९ प्रभाग चार सदस्यीय, वीस क्रमांकाच्या प्रभागात पाच नगरसेवक !!माजी सैनिक पत्नीसह गिरविणार दूरशिक्षणाचे धडे संयुक्त न्यू शाहूपुरीतर्फे एकत्रित मिरवणूकअमल महाडिकांनी केली पाचगाव केंद्र शाळेची पाहणीओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलनकसबा बीड महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजराआरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे, एनएचएमचे कर्मचारी समायोजनासाठी दहा दिवस रस्त्यावरगणेशोत्सवातील कामांना शिक्षकांचा विरोध, सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचाच जयजयकार, साडेतीन लाखाहून अधिक मूर्ती संकलितसाऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार   

जाहिरात

 

कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचाच जयजयकार, साडेतीन लाखाहून अधिक मूर्ती संकलित

schedule03 Sep 25 person by visibility 68 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विसर्जित मूर्ती दान आणि निर्माल्य दान उपक्रमाला यंदाही कोल्हापूरकरांनी भरभरुन प्रतिसाद दिला. कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात मिळून तब्बल साडे तीन लाखाहून अधिक विसर्जित मूर्ती दान करण्यात आल्या. तसेच शेकडो टन निर्माल्यही जमा झाले. पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाची परंपरा यंदाही जपली. कोल्हापूर महापालिका हद्दीत ४८ हजार ४२३ गणेश मूर्ती संकलि झाल्या. तर जिल्हयात दोन लाख ९० हजार ७४८ मूर्ती संकलित झाल्या असे जिल्हा परिषदेने म्हटले आहे. जिल्ह्यात २९३१ गणेशमूर्तींचे विसर्जन घरच्या घरी झाले.
पंचगंगा प्रदूषणमुक्ती तसेच जिल्हयातील जलस्त्रोत प्रदूषणमुक्त ठेवण्याच्या हेतूने जिल्हा परिषद व महापालिकेतर्फे पर्यावरणपूरक गणेश उत्सवाची साद घालण्यात आली होती. ठिकठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले. तलाव, पाणवठे प्रदूषित होणार नाहीत यासाठी खबरदारी घेतली. महापालिका हद्दीतही प्रभागनिहाय कृत्रिम विसर्जन कुंड तयार केले होते. इराणी खण येथे मूर्ती विसर्जनाची सोय केली होती. महापालिका प्रशासक के.मंजुलक्ष्मी यांनी अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन पर्यावरणपूरक गणेश विसर्जन व त्या अनुषंगाने सुविधा निर्माण करण्याच्या सूचना केल्या होत्या. पंचगंगा घट परिसरातील अपवाद वगळता इतर ठिकाणी पर्यावरणपूरक विसर्जनाचा गजर घुमला. रंकाळा तलाव, इराणी खण, राजाराम तलाव, कोटीतीर्थ तलाव, राजाराम बंधारा, कळंबा तलाव येथे मूर्ती दान व निर्माल्य दान उपक्रमाला प्रतिसाद मिळाला. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी नागरिकांच्या मदतीला होते.

‘जिल्हयातील सर्व गावांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमामध्ये सहभागी होऊन जलस्त्रोत प्रदूषणमुक्त  ठेवावेत’असे आवाहन जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी आधिकारी कार्तिकेयन एस. यांनी केले होते. कार्तिकेयन यांनी, चंदगड तालुक्यातील शिनोळी व महिपाळगड या गावांना भेट देऊन उपक्रमाची पाहणी केली. सर्वच विभागाच्या अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी निश्चित केली होती. करवीर तालुक्यात ६८ हजार ५६५ मूर्तीं, हातकणंगले तालुक्यात ३३ हजार ९३५, कागल तालुक्यात ३० हजार ४६६, भुदरगडमध्ये वीस हजार १७४, गडहिंग्लजमध्ये २० हजार २४५, पन्हाळा तालुक्यात २४ हजार ७५९, राधानगरी तालुक्यात २३ हजार ९४२ , आजरा तालुक्यात १६ हजार २३७, चंदगड तालुक्यात १४ हजार १३३ तर गगनबावडा तालुक्यात ४ हजार १८९ तर शिरोळ तालुक्यात १७ हजार २५ गणेशमूर्ती पर्यावरणपूरक विसर्जित केल्या.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes