अमल महाडिकांनी केली पाचगाव केंद्र शाळेची पाहणी
schedule03 Sep 25 person by visibility 507 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : पावसामुळे पाचगाव येथील केंद्र शाळा विद्यामंदिर या शाळेचा बराचसा भाग कोसळला. शाळा इमारतीचे नुकसान झाले आहे . दरम्यान शाळेला सुट्टी होती. सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. ही शाळा 1954 मध्ये बांधली होती.
शाळा व्यवस्थापने इमारत निर्लेखनाचा प्रस्ताव पाठविला आहे. मात्र त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. शाळेची इमारत कोसळल्याचे समजल्यानंतर आमदार अमल महाडिक यांनी पाचगाव येथे येऊन शाळेची पाहणी केली. यावेळी माजी सरपंच संग्राम पाटील, ग्राम पंचायतीचे सदस्य सागर दळवी, ग्रामपंचायतचे माजी सदस्य भिकाजी गाडगीळ, महेश पाटील, करवीर पंचायत समितीचे शाखा अभियंता प्रमोद चौधरी , ग्राम विकास अधिकारी अजित राणे, शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील , पाचगाव मंडळ अधिकारी रामदास लांब, तलाठी शिवराज देसाई, कोतवाल संभाजी पाटील, शिक्षण समितीचे साताप्पा पाटील, रणजीत व्हरगे,, संजय पाटील, भीमराव भोळे स्वप्निल गाडगीळ सचिन पाटील, सागर इरळेकर आदी उपस्थित होते.