कसबा बीड महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
schedule03 Sep 25 person by visibility 40 categoryक्रीडा

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : सद्गुरू शिक्षण संस्था संचलित महिला महाविद्यालय कसबा बीड (ता. करवीर ) जिमखाना विभागाच्या ' राष्ट्रीय क्रिडा दिन ' साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख कल्लेश्वर ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य डी. के.भोपळे व क्रार्यक्रमाचे अध्यक्ष महिला महाविद्यालयाचे प्राचार्य एन.एम.पाटील याच्या हस्ते मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व क्रीडा साहित्याचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांचा सत्कार व कौतुक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्राचार्य एन.एम.पाटील यांनी क्रीडा दिनाचे व खेळाचे महत्व विशद केले. प्राचार्य भोपळे, विद्यार्थिनी विराणी खांडेकर यांची भाषणे झाली. जिमखाना विभाग प्रमुख प्रा. सुप्रिया कालेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. मंजुषा काटाळे यांनी आभार मानले.