ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलन
schedule03 Sep 25 person by visibility 60 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : "ओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, हैदराबाद गॅजेट रद्द करा." अशा घोषणा देत ओबीसी जनमोर्चातर्फे कोल्हापुरात निदर्शने करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी 3 सप्टेंबर रोजी आंदोलन करण्यात आले. तसेच जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. ओबीसी मध्ये मराठा समाजाचा समाज करण्यास आमचा ठाम विरोध आहे. मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास नसताना सुद्धा 58 लाख मराठ्यांना कुणबी नोंदणी द्वारे दिले गेलेले बोगस जातीचे दाखले तत्काळ रद्द करावेत या मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. मराठा समाजाच्या नोंदी तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेली न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही घटनाबाह्य असून ती तत्काळ प्रकाश करावी असे निवेदनात म्हटले आहे या आंदोलनात दिगंबर लोहार, व्यंकाप्पा भोसले, एकनाथ कुंभार, सुभाष गुरव, मोहन हजारे , मीनाक्षी डोंगरसाने, चंद्रकांत कोवळे, किशोर लिमकर, पंडित परीट, तानाजी नंदीवाले, शिवाजी कदम, राजाराम सुतार, प्रमोद कुंभार, संभाजीराव पोवार,कृष्णात कुंभार, सचिन सुतार यांचा समावेश आहे.