संयुक्त न्यू शाहूपुरीतर्फे एकत्रित मिरवणूक
schedule03 Sep 25 person by visibility 32 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : गणेश उत्सव म्हणजे तरुणाईसाठी उत्साह विविध कार्यक्रमाची रेलचेल, मंडळाचे देखावे व मिरवणुकीसाठी चढाओढ पण याला अपवाद ठरले संयुक्त न्यू शाहूपुरी मंडळ सामाजिक कार्यकर्ते दौलत देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली चॅम्पियन तरुण मंडळ ,दाभोळकर कॉर्नर मित्र मंडळ, शिवकुमार ग्रुप, जस्ट रिलॅक्स तरुण मंडळ, सत्यम तरुण मंडळ , नवयुवक क्रीडा मंडळ, शिवतेज तरुण मंडळ, करवीर स्पोर्ट्स न्यू शाहूपुरी तालीम मंडळ या सर्व मंडळांनी एकत्र येऊन शांततामय वातावरणात एकोपा जपत संयुक्त मिरवणूक काढली.या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते दौलत देसाई ,आदर्श बनसोडे ,मंथन शहा, तसेच सर्व मंडळांचे अध्यक्ष उपाध्यक्ष व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .