Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने घेतली प्रशासकीय मंडळची भेटसर्जन्स वीकनिमित्त कोल्हापूर सर्जिकल सोसायटीतर्फे सामाजिक उपक्रम चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत मेघराज राजेभोसले यांचे पॅनेल विजयी, 17 पैकी सोळा जागा जिंकल्यामहामानवांच्या विचारकार्यांचे नियोजनबद्ध संशोधन व्हावे - पालकमंत्री प्रकाश आबिटकर वीरशैव लिंगायत समाजातर्फे गुणवंत  विद्यार्थ्यांचा सत्कारविकास प्रकल्पाच्या नावाखाली शेतकऱ्यांना भूमिहीन करण्याचा डाव…नांगरट साहित्य संमेलनात सरकारी धोरणावर ओढले आसूडकोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी गृहतारण संस्थेच्या भोगावती शाखेचा प्रथम वर्धापनदिन साजरागोकुळमध्ये शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजराचित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणीडॉ. जे. के. पवार लिखित राजर्षी शाहू महाराज : संक्षिप्त चरित्र पुस्तकाचे इंग्रजीत भाषांतर, गोव्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन

जाहिरात

 

चित्रपट महामंडळासाठी कोल्हापूर-पुण्यात चुरशीने मतदान, सोमवारी मतमोजणी

schedule07 Jun 26 person by visibility 102 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आरोप,प्रत्यारोपामुळे गाजलेल्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी रविवारी, सात जून २०२६ रोजी मतदान झाले. महामंडळाच्या  ३४०३ सभासद मतदारापैकी १६९८ इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाची टक्केवारी ४९.९० टक्के इतकी आहे. कोल्हापूर आणि पुणे केंद्रावर चुरशीने मतदान झाले. दरम्यान सोमवारी, सकाळी नऊ वाजता राम गणेश गडकरी सभागृह येथे सकाळी नऊ  वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे. उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी आठ वाजता उपस्थित  राहावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी रागिणी खडके यांनी केले.

महामंडळाच्या एकूण सतरा जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यापैकी अभिनेत्री गटातून वर्षा ऊसगावकर, संकलन गटातून विजय खोचीकर तर गायक गटातून आनंद शिंदे यांची बिनविरोध निवड झाली. उर्वरत चौदा जागेसाठी ४४ उमेदवार रिंगणात होते. समर्थ पॅनेल व चित्रकर्मी पॅनेलमध्ये थेट लढत झाली. सोळा अपक्ष उमेदवार रिंगणात होते. कोल्हापूर, पुणे, नाशिक, मुंबई, सोलापूरमधील मिळून एकूण बारा केंद्रावर मतदान झाले.कोल्हापूर केंद्रातील एकूण ७४० मतदारापैकी  ५१७ मतदारांनी मतदान केले. कोल्हापुरातील मतदानाची टक्केवारी ६९.८६ टक्के आहे. कोल्हापूर केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी चुरस पाहावयास मिळाली. पुणे केंद्रातील ७२९ मतदारापैकी ४६० मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ६३.१० टक्के इतकी आहे. सोलापूर केंद्रातील १०७ पैकी ६३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मुंबईत सर्वाधिक मतदार आहेत. १५७३ मतदारापैकी केवळ ५३९ मतदारांनी मतदान केले. मुंबईतील मतदानाची टक्केवारी ३७.६४ टक्के इतकी आहे. नाशिक येथे २५४ मतदार आहेत. त्यापैकी ११९ जणांनी मतदान केले.

यंदाची निवडणूक आरोप, प्रत्यारोपामुळे गाजली. सत्ताधारी समता पॅनेलचे नेतृत्व मेघराज भोसले, अभिनेता सुशांत शेलार, संजय ठुबे  यांनी केले. चित्रकर्मी पॅनेलची धुरा नेतृत्व सतीश रणदिवे, आनंद काळे, पितांबर काळे, अभिनेत्री वर्षा ऊसगावकर, रणजीत जाधव, विजय शिंदे यांनी सांभाळली. नृत्य दिग्दर्शक संग्राम भालकर, कलादिग्दर्शक सुनील घोरपडे, संतोष शिंदे, अवधूत जोशी यांनी अपक्ष म्हणून लढले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes