Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरीसाथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या  कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजलीहमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!"

जाहिरात

 

अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!

schedule05 Aug 26 person by visibility 94 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : अनेकांना जगण्याचा बळ देणाऱ्या, असंख्य कुटुबांना आधार देणाऱ्या, लाखोंचे जीवन फुलविण्याऱ्या, देशाच्या शिक्षण क्षेत्राला दिशा देणा-या ज्ञानतपस्वी माजी राज्यपाल व  पद्मश्री  डॉ. डी. वाय.पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर लोटला. बुधवारी (पाच ऑगस्ट २०२६) सायंकाळच्या सुमारास पॅव्हेलियन मैदान येथे पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. तिरंग्यात लपटलेल्या  डॉ.पाटील यांच्या पार्थिवाला पोलीस पथकाने बंदुकीच्या फेरी झाडून मानवंदना दिली.* 

कसबा बावडा येथील यशवंत निवासस्थानाहून फुलांनी सजविलेल्या वाहनामध्ये पद्मश्री डॉ. डी.वाय.पाटील  यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.  मेडिकल कॉलेज - लाईन बाजार- भगवा चौक - कसबा बावडा- मेन रोड - श्रीराम सोसायटी रस्ता - गवत मंडई - फायर स्टेशन मार्गे त्यांची अंत्ययात्रा पॅव्हेलियन मैदान आली. यावेळी आपल्या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. 

याप्रसंगी विविध मान्यवर आणि प्रशासन यांच्याकडून पुष्पचक्र अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावतीने उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकात  पाटील, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, डॉ. योगेश जाधव राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे  प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी अर्थमंत्री आमार जयंत पाटील, माजी मंत्री यशोमती ठाकूर, माजी मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यावतीने आमदार अंबादास दानवे, माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार अमित देशमुख, आमदार विश्वजित कदम,  आमदार डॉ. विनय कोरे, चंद्रदीप नरके, शिवाजी पाटील, प्राजक्त तनपुरे, हेमंत ओगले, आमदार जयंत आसगावकर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार राजु शेट्टी, संजय मंडलिक, निवेदिता माने, युवराज संभाजीराजे, माजी आमदार के.पी. पाटील, राजू जयवंतराव आवळे, राजीव किसन आवळे, सत्यजित पाटील, भगवानराव साळुंखे, उपमहापौर अक्षय जरग यांनी पुष्पचक्र अर्पण करुन आदराजंली वाहिली. तर प्रशासनाच्यावतीने कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, कोल्हापूर महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅस्मिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे आदींनी आदराजंली वाहिली. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, आमदार सतेज डी. पाटील, डॉ. विजय डी पाटील, डॉ.अजिंक्य डी पाटील, डॉ. उद्धव पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, डॉ. पी. डी. पाटील, डॉ. भाग्यश्री पी. पाटील यांच्यासह कुटुबीयांचे उपस्थित होते. अमर रहे, अमर रहे,  डी.वाय दादा अमर रहे  च्या घोषणांनी वातावरण अधिकच भावूक केले

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes