Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरीसाथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या  कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजलीहमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!"

जाहिरात

 

हमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!"

schedule04 Aug 26 person by visibility 341 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मोहन मेस्त्री, कोल्हापुरातील एक नावाजलेले छायाचित्रकार. विविध दैनिकात फोटोग्राफर म्हणून काम केले आहे. उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी नावाजलेले हे फोटोग्राफर. त्यांना हस्तकलेची आवड आहे.   टाकाऊ वस्तूपासून सुंदर कलाकृती तयार  करत आहेत. करंवटीपासून त्यांनी तयार केलेल्या कलाकृतीं तर खास आकर्षण ठरल्या आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी हस्तकला आत्मसात केली. त्यांच्या कलाकृतीचे नुकतेच प्रदर्शनही भरले होते. दरम्यान त्यांनी सोशल मिडियावर एक कौटुंबीक प्रसंग शेअर केला आहे. त्यामध्ये आई वडील आणि मुलींतींल प्रेम, मायेचा ओलावा जसा प्रकटतो तसेच ‘मुलीसुद्धा मुलांपेक्षा कमी नाहीत, जबाबदारी पेलण्यात तसूभरही मागे नाहीत.’हे अधोरेखित करणारे कृतीशील उदाहरण ‘वंशाचा दिवा मुलगाच’यालाही छेद देणारे आहे. मोहन मेस्त्री यांची सोशल मिडियावरील पोस्टत्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे

​"बाबा, मला वाढदिवसाला काय गिफ्ट देणार?" – मुलांनी हट्ट धरायचा आणि पालकांनी कौतुकाने तो पुरवायचा, हाच आजवरचा प्रघात. वयाची पंचविशी म्हणजे तर स्वप्नांत जगायचं, बागडायचं आणि आईबाबांकडे हट्ट करायचं वय! ज्या वयाला आपण गद्धे पंचविशी म्हणतो, त्याच वयात एखाद्या लेकीने स्वतःच्या वाढदिवसाला बाबांकडे काहीही न मागता, उलट आईबाबांनाच एक स्वप्नवत सरप्राइज गिफ्ट दिलं तर...?

​असाच एक अविस्मरणीय आणि सुखद धक्का आम्हाला आमच्या क्षितिजाने दिला! ​वाढदिवस साजरा करण्यासाठी सिद्धी आणि क्षितिजा दोघी पुण्याहून घरी येत होत्या. त्या येणार म्हणून आम्ही काही कामानिमित्त बाजारात गेलो होतो, त्यामुळे त्या काही वेळ मैत्रिणीकडे थांबल्या. आम्ही घरी आलो आणि दारात एक छान कार येऊन थांबली... कोणतरी असेल म्हणून शांतीने दुर्लक्ष केले...पण दोघी गाडीतून उतरल्या आणि दोघींनी आईच्या हातात चावी ठेवत म्हटलं, "आई, ही बघा आपली कार !" ​माझी पत्नी, शांतीचा यावर काही विश्वासच बसला नाही. खरं तर एखादी मोठी कार आपल्या मुली आपल्याला गिफ्ट देतील, असं स्वप्नही आम्ही कधी पाहिलं नव्हतं. त्यामुळे हा आनंद पचवायला आणि मनाला पटायला काही वेळ लागलाच. पाच दिवसांपूर्वी मुलींनी पुण्यात खरेदी केलेली 'होंडा ॲमेझ' कार कोल्हापुरात थेट दारापर्यंत आणेपर्यंत आम्हाला त्याची पुसटशी कल्पनाही लागू दिली नव्हती ! ​

खरंच, हा 'सुखद धक्का' अजूनही मनाला एका वेगळ्याच आनंदाच्या डोहात ठेवून आहे.  ​आयुष्याच्या प्रवासात अनेकदा लोकांनी "तुम्हाला दोन मुलीच आहेत का?" असा प्रश्न उपरोधाने किंवा सहानुभूतीने विचारल्याचं आठवतं. मुलगाच हवा या मानसिकतेतून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आज माझ्या मुलींनी त्यांच्या कर्तृत्वाने दिली.  ​मुली हे परक्याचं धन असतं असं म्हणणाऱ्यांना माझ्या मुलींच हे उत्तरच आहे. आईबाबांच्या डोळ्यांतील आनंदाश्रू आणि मुलींच्या चेहऱ्यावरचा स्वाभिमान... यापेक्षा मोठा वाढदिवस आणि यापेक्षा मोठी भेट एका बापासाठी काय असू शकते ?

  म्हणूनच आज 'दंगल' चित्रपटातील तो संवाद मनामध्ये उभा राहतो..

​"हमारी बेटियाँ भी बेटों से कम हैं क्या...!" क्षितिजाला वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा आणि दोन्ही लेकींच्या कर्तृत्वाला मानाचा मुजरा !!

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes