Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
डी.वाय.दादांचं मोठेपण अधोरेखित करणारी 'ती'...अमर रहे -अमर रहे, डी. वायदादा अमर रहे ! ज्ञानसुर्याला अखेर निरोप देण्यासाठी जनसागर लोटला !!करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकरभारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाहीक्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनावर आधारित ‘पत्री सरकार १९४२’ चित्रपटाचे टिझर प्रदर्शितहॅलो… मी, डी.वाय. पाटील बोलतोय ! !ब्राह्मण सभा करवीर मंगलधामतर्फे " संतांचे संगती " निरुपणास प्रारंभ साहित्यिक प्रा.चंद्रकुमार नलगे हे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचा कणा : डॉ. शशिकांत चौधरीसाथी भरत लाटकर यांना आझादी की जंगच्या  कलाकारांनी मुंबईत श्रद्धांजलीहमारी बेटियाँ भी…बेटों से कम हैं क्या...!"

जाहिरात

 

भारतीय मजदूर संघाच्या मागण्यासंबंधी लवकरच उच्चस्तरीय बैठक, मुख्यमंत्र्यांची ग्वाही

schedule05 Aug 26 person by visibility 16 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भारतीय मजदूर संघाच्या प्रतिनिधींची बुधवारी, पाच ऑगस्ट २०२६ रोजी बैठक झाली. भारतीय मजदूर संघाच्या विविध मागण्यांवर विचार करण्यासाठी लवकरच एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. बैठकीत नवीन कामगार कायदे (लेबर कोड): बैठकीत भारतीय मजदूर संघाची लेबर कोडविषयीची भूमिका सविस्तरपणे मांडण्यात आली. या लेबर कोडमधील कामगार विरोधी तरतुदी रद्द कराव्यात आणि जे कामगार या कायद्याच्या कक्षेतून बाहेर जात आहेत, त्यांच्यासाठी एक स्वतंत्र कायदा तयार करण्यात यावा अशी विनंती करण्यत आली. तसेच  राज्यात कामगार राज्य विमा योजना अत्यंत प्रभावीपणे राबवावी. बोनस मर्यादा वाढवून ४२,००० रुपये करावी. राज्य सरकार अंतर्गत काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांसाठी हरियाणा पॅटर्न लागू करावा. कामगार कपात नुकसान भरपाई ६० दिवस करावी. ईपीएस पेन्शनधारकांना २,००० रुपये पेन्शन देण्यात यावी. विश्वकर्मा जयंती अधिकृतपणे शासकीय सण म्हणून घोषित करावी. विडी कामगारांना किमान वेतन या मागण्या करण्यात अल्या.या मगण्यासंबंधी सकारात्मक निर्णय घेऊ असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले. बैठकीस भारतीय मजदूर संघाच्या वतीने अखिल भारतीय सेक्रेटरी ॲड. अनिल ढुमणे, प्रदेश महामंत्री किरण मिलगिर, विदर्भ महामंत्री गजानन गटलेवार आणि सह क्षेत्र संघटनमंत्री मोहन येणुरे हे उपस्थित होते. तसेच मुख्यमंत्र्यांचे सचिव श्रीकर परदेशी, महेश पोहणेरकर उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes