करवीर तालुका शिक्षक - शिक्षकेतर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम पाटील, व्हाइस चेअरमनपदी निता ठाणेकर
schedule05 Aug 26 person by visibility 46 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर तालुका शिक्षक शिक्षकेत्तर पतसंस्थेच्या चेअरमनपदी धोंडीराम शिवाजी पाटील (विद्यामंदिर दुर्गुळवाडी) यांची तर व्हाइस चेअरमनपदी निता संजय ठाणेकर (केंद्र शाळा वडणगे) यांची निवड झाली. सहायक श्रेणी दोन उपननिबंका कार्यालयातील अधिकारी श्रीमती एस. एस. आडसुरे, स्वाती पवार व तानाजी पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या निवडी झाल्या. शिक्षक नेते राजाराम वरुटे, शंकर भोई, बाजीराव लगारे शब्बीर मुजावर यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी के. एल. खाडे, राजाराम शिर्के, आनंदा बेडेकर, प्रशांत पोतदार, बाजीराव कांबळे, करवीर तालुका शिक्षक संघ अध्यक्ष साताप्पा चौगले, मारुती दिंडे, माजी चेअरमन दत्तात्रय एकशिंगे, माजी व्हाइस चेअरमन नूरजहाँ मुल्लाणी आदी उपस्थित होते.