एसएनडीटीचा प्रादेशिक युवा महोत्सव यंदा वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात
schedule09 Sep 25 person by visibility 51 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबईतर्फे आयोजित करण्यात येणारा प्रादेशिक युवा महोत्सव १२ व १३ सप्टेंबर २०२५ रोजी शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालय, तिटवे येथे होणार आहे. या दोन दिवसीय युवा महोत्सवात सांस्कृतिक कला, लोककला आणि आधुनिक कलेचा सुंदर संगम दिसून येणार आहे. नृत्य, गायन, नाट्य, चित्रकला, वक्तृत्व, लोकनृत्य तसेच ललितकलेच्या इत्यादी स्पर्धांमधून विद्यार्थ्यांच्या प्रतिभेला वाव मिळणार आहे. युवा महोत्सवाचे उद्दिष्ट केवळ मनोरंजन नव्हे, तर विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, भारतीय संस्कृतीचे जतन करणे हा आहे.या युवा महोत्सवात विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थी सहभागी होणार आहेत. “तरुणींच्या कलेचा रंगोत्सव – प्रादेशिक युवामहोत्सव २०२५” मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कला आणि संस्कृतीचा आनंद घ्या, असे आवाहन शहीद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रशांत पालकर यांनी केली केले आहे.