सरकारी शिष्यवृत्ती जिल्हानिहाय्य गुणवत्ताधारक विद्यार्थी कोटा संख्या वाढवा :
schedule09 Sep 25 person by visibility 65 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राज्यातील पूर्व उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांच्या मधील गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी सरकारमार्फत सध्या इयत्ता पाचवी व आठवीच्या वर्गांसाठी परिक्षा घेतल्या जातात. यापूर्वी इयत्ता चौथी व सातवीच्या वर्गांसाठी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षांचे आयोजित केले जात होते. या परीक्षांचा जिल्हा निहाय गुणवत्ताधारक विद्यार्थी संच ( कोटा ) वाढवावा अशी मागणी राज्याचे शिक्षण आयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्यावतीने करण्यात आली. मागणीचे निवेदन उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव यांनी स्विकारले. शिष्टमंडळात महासंघाचे राज्य सचिव राजेंद्र कोरे, जिल्हाध्यक्ष टी आर पाटील, सचिव नितीन पानारी, जिल्हा महिला अध्यक्षा गिरीजा जोशी, जिल्हा प्रवक्ता सुरेंद्र तिके, खजाणिस गौतम कांबळे, शहराध्यक्ष संतोष पाटील, शहर सहसचिव धनंजय शिंदे, शहर प्रवक्ता अरविंद चव्हाण, कार्याध्यक्ष अभिजीत साळोखे,करवीर तालुका अध्यक्ष राज मेंगे, पांडुरंग जाधव, सरदार पाटील, पूनम पाटील, उत्तम पोवार यांचा सहभाग होता.
सध्या कोल्हापूर जिल्हयातील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संच संख्या ५९१ तर उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती गुणवत्ताधारक विद्यार्थी संख्या ४७५ इतकी आहे. या संख्येमध्ये गेले अनेक वर्षे बदल झालेला नाही. परिणामी अनेक गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शासनाच्या शिष्यवृत्ती पासून वंचित राहावे लागत आहे. जे विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत येतात त्या बरोबर अनुक्रमे जे दहा विद्यार्थी देश पातळी वरील गुणवता यादीत येतात अशा विदयार्थ्यांना किमान १०,००० रुपये इतका विशेष आर्थिक लाभ द्यावा. अशीं मागणी केली.
.......................................
" शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थी संच संख्या म्हणजे कोटा वाढवल्यास शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहता त्याचा सर्वाधिक कोल्हापूर जिल्ह्याला होईल. त्याचबरोबर तो राज्यातील विद्यार्थ्यांना सुद्धा होईल. मागणी मान्य झाल्यास राज्य गुणवत्ता यादीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना विशेष आर्थिक लाभ मिळेल. "
टी. आर. पाटील, जिल्हाध्यक्ष खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ
……………………