वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी एन एच पाटील
schedule09 Sep 25 person by visibility 76 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : वारणा विद्यापीठ, वारणानगर या विद्यापीठाचे, पहिले कुलाधिकारी (प्रोवोस्ट) म्हणून नामदेव हिंदुराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या आदेशान्वये ही नियुक्ती करण्यात आली आहे. उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने हा आदेश काढला.कुलाधिकारी पाटील हे पारगांवचे आहेत. सुराज्य फाउंडेशनचे अध्यक्ष, तात्यासाहेब कोरे वारणा नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष, वारणा साखर कारखान्याचे तज्ञ संचालक यासह विविध संस्थांची धुरा ते यशस्वीपणे सांभाळत आहेत.सुराज्य फाऊंडेशनची स्थापना 2006 मध्ये झाली. ही संस्था धार्मिक, कृषी, शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांत कार्यरत असून ग्रामीण विकास, सहकार आणि सर्वांगीण प्रगतीसाठी प्रयत्नशील आहे.
अध्यक्ष, वारणा विविध उद्योग शिक्षण समूह डॉ. विनय कोरे, विद्यापीठाचे कुलगुरू, डॉ. डी. टी. शिर्के, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. व्ही. व्ही. कारजिनी यांनी शुभेच्छा दिल्या.