इंग्रजी माध्यमातील शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करावेत-पालकमंत्री प्रकाश आबिटकर
schedule09 Sep 25 person by visibility 38 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी, कल विचारात घेऊन शिक्षण दिले पाहिजे. इंग्रजी माध्यमातील शिक्षणाकडे कल वाढताना दिसत आहे. यामुळे इंग्रजी माध्यमातील शाळा व शिक्षकांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या समस्या सोडविण्यासाठी लवकरच बैठक घेऊ’असे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सांगितले.
इंग्लिश मीडियम स्कूल असोसिएशन (इम्सा) कोल्हापूरतर्फे शिक्षक पुरस्कार वितरण कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आबिटकर बोलत होते. प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी मीना शेंडकर, माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत उपस्थित होते. हॉटेल सयाजी येथे कार्यक्रम झाला. याप्रसंगी मुख्याध्यापक, शिक्षक मिळून ४१ जणांना इम्सा पुरस्कारांनी गौरविले.याप्रसंगी असोसिएशनचे राज्य सचिव प्राचार्य प्रभाकर हेरवाडे यांनी मार्गदर्शन केले.
असोसिएशनचे प्रदेशाध्यक्ष गणेश नायकुडे, अमर सरनाईक, नितीन पाटील, सुहेल बाणदार, मोहन माने, एन. एन. काझी, विल्सन वास्कर, दत्तात्रय रणदिवे, संजय जाधव, सागर माने, प्रकाश पाटील आदी उपस्थित होते. असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष महेश पोळ यांनी प्रास्ताविक केले. जिल्हाध्यक्ष के. डी. पाटील यांनी स्वागत केले. सचिन नाईक यांनी आभार मानले