गोकुळमार्फत यंदा युवा दूध उत्पादक वर्ष ! युवकांना दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाच्या नवीन संधी !
schedule08 Sep 25 person by visibility 77 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने यावर्षांला ‘युवा दूध उत्पादक वर्ष’ म्हणून साजरे करण्याचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील युवकांना दुग्ध व्यवसायाकडे आकर्षित करून उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा संकल्प गोकुळने केला आहे. ’असे चेअरमन नविद मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
गोकुळची मंगळवारी, ९ सप्टेंबर २०२५ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. यंदाच्या ६३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर संघाने गेल्या काही महिन्यांत राबवलेल्या उपक्रमांचा आढावा घेऊन शेतकऱ्यांसमोर आणखी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. मुश्रीफ म्हणाल, वार्षिक सभेत दूध उत्पादक सभासदांना प्रश्न विचारण्याचा व सूचना देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. प्रत्येक प्रश्नाला समाधानकारक उत्तरे दिली जातील. तसेच सुचवलेले मुद्दे प्रत्यक्ष अंमलात आणले जातील संस्था प्रतिनिधींनी मांडलेला प्रत्येक प्रश्न व सूचना ही संघासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्यांची नोंद घेऊन उत्पादकांच्या हितासाठी आवश्यक ती ठोस पावले उचलण्यात येतील. गोकुळ दूध संघ हा दुग्ध व्यवसायामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील आदर्श दूध संघ ठरला आहे.
मुश्रीफ यांनी म्हटले आहे, सभासदाभिमुख योजनेमुळे ‘गोकुळ’वरील दूध उत्पादकांचा विश्वास अधिक द्विगुणित झाला आहे. वीस लाख लिटर संकलनाचे उद्दिष्ट गाठणे, म्हैस दूध वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी आणखी प्रोत्साहन योजना, फर्टीमीन प्लस अनुदार योजना, तसेच जातिवंत रेडी/वासरू संगोपन योजना या योजनेसह गोकुळ चे दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीत वाढ होण्यासाठी तसेच गोकुळचे दुग्धजन्य पदार्थ आंतरराष्ट्रीय बाजार पेठेमध्ये विक्री करणेसाठी संघाचे वितरण (मार्केटिंग) यंत्रणा अधिक सक्षम करणे यावर भविष्यात लक्ष राहिल. गोकुळने नुकतीच म्हैस व गाय दूध खरेदी दरात प्रतिलिटर १ रुपयेची वाढ केली असून यामुळे गोकुळच्या दूध उत्पादकांना महिन्याला जवळपास ५ कोटी रुपयांचा जादा दर मिळणार आहे