Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या गौरवार्थ विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदकारखानदारांची उद्योगमंत्र्यांसोबत भेट ! उद्यमनगरात एफएसआय वाढ, गोकुळ शिरगावमध्ये फायर ब्रिगेड स्टेशन, स्मॅक परिसरातील कचरा डेपो हलविणार !!वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी एन एच पाटील पोटनियम दुरुस्तीला मंजुरी, गोकुळचे संचालक २५ होणार ! संघातर्फे आईस्क्रीम-बासुंदीचे उत्पादन, वासाच्या दूध खरेदीदरात दुप्पट वाढ!!एसएनडीटीचा प्रादेशिक युवा महोत्सव यंदा वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातसरकारी शिष्यवृत्ती जिल्हानिहाय्य गुणवत्ताधारक विद्यार्थी कोटा संख्या वाढवा :इंग्रजी माध्यमातील शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करावेत-पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा बँकेकडून शेतकरी, विद्यार्थी, महिला सक्षमीकरणासाठी योजनांची खैरात ! इंडस्ट्रीजलाही अर्थ पुरवठा !!गोकुळमार्फत यंदा युवा दूध उत्पादक वर्ष ! युवकांना दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाच्या नवीन संधी ! हॉकी स्टेडियम जवळील जागेवर मराठा भवन उभारा-आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

जिल्हा बँकेकडून शेतकरी, विद्यार्थी, महिला सक्षमीकरणासाठी योजनांची खैरात ! इंडस्ट्रीजलाही अर्थ पुरवठा !!

schedule08 Sep 25 person by visibility 67 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी मध्यवर्ती सहकारी बँकेतर्फे शेतीमध्ये एआय वापरासाठी सवलत, उच्च शिक्षणासाठी आठ टक्के दराने तीस  लाखापर्यत कर्ज, लाडक्या बहिणीसाठी ताराराणी महिला सक्षमीकरणासाठी कर्ज आणि इंडस्ट्रीजला वित्त पुरवठा अशा विविध योजना चेअरमन व मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केल्या.

बँकेची ८७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी (८ सप्टेंबर २०२५) झाली. येथील महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित सभेला सभासदांनी गर्दी केली होती. या सभेत विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर केले. शेतकऱ्याना सरसकट कर्जमाफी व ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण हे ठराव सभेत मंजूर झाले. यानंतर प्रश्नोत्तरे झाली.  यावेळी बोलताना मुश्रीफ यांनी,दौलत साखर कारखाना हा सभासदांचाच राहील. अथर्व कंपनीकडून कर्ज भरणा न झाल्यास जिल्हा मध्यवर्ती बँक कर्ज भरुन हा कारखाना सभासदारांचा करेल असे त्यांनी स्पष्ट केले. ३१ मार्च २०२५ अखेर बँकेची आर्थिक प्रगती सांगताना मुश्रीफ म्हणाले, ‘बँकेकडे दहा हजार ६३५ कोटी ठेवी आहेत, ७,४२३ कोटी कर्ज वाटप केले आहे. शून्य टक्के एनपीए आहे. वसूल भाग भांडवल ३०७ कोटी आहे. निधी ८७४ कोटी तर गुंतवणूक ४६८८ कोटी आहे. विविध तरतुदीनंतर  बँकेला निव्वळ नफा ९० कोटी रुपये झाल्याचे त्यांनी सभेत सांगितले.

शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी एक कोटी इतका फंड उभारला आहे. कृषी ड्रोन खरेदीसाठी दहा लाखापर्यंत कर्ज धोरण आहे. जातीवंत म्हैस खरेदीसाठी दीड लाखापर्यंत कर्ज पुरवठा केला जाईल आणि या कर्जाची परतफेड तीन वर्षात केल्यास शेवटच्या हप्त्यामध्ये दहा हजार रुपयांची सवलत देऊ असेही मुश्रीफ यांनी म्हटले. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील पीक प्रोत्साहन अनुदान योजना जाहीर केली. या अंतर्गत सभासद पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली करणाऱ्या संस्थांना प्रोत्साहन म्हणून बँकेकडील पीक कर्ज खातेवरील एक टक्के व्याज रिबेट देण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी जी. एम. शिंदे यांनी अहवाल वाचन केले. व्हाईस चेअरमन राजू आवळे यांनी आभार मानले. सभेला संचालक आमदार सतेज पाटील, राजेंद्र पाटील यड्रावकर, अमल महाडिक, माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, संजय मंडलिक, माजी आमदार राजेश पाटील, संजय घाटगे, भैया माने, ए. वाय. पाटील,बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, श्रृतिका काटकर, स्मिता गवळी, राजेश पी. एन. पाटील, संतोष पाटील, रणजितसिंह पाटील, सुधीर देसाई, अर्जुन आबिटकर, रणवीरसिंह गायकवाड, विजयसिंह माने, कर्मचारी प्रतिनिधी दिलीप  लोखंडे, इम्तेहाच मुनशी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे उपस्थित होते.

……………………

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes