Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरणवारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजराकोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाई

जाहिरात

 

महापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणार

schedule22 Jun 26 person by visibility 32 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर  :  सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपआपल्या कार्यक्षेत्रातील तसेच संलग्न उपनगरांतील अनधिकृत पाणी कनेक्शनचा शोध घेऊन कारवाई करावी’अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारुड यांनी केल्या.

महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात विभागप्रमुखांची आढावा बैठक आयुक्त भारुड घेतली. यावेळी शहरातील पाणीपुरवठा, करवसुली, अतिक्रमण निर्मूलन, शिक्षण, उद्याने तसेच विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पाणीपुरवठा विभागाने गळती दुरुस्तीबरोबरच अनधिकृत पाणी कनेक्शनविरोधातील मोहीम अधिक तीव्र करावी तसेच विभागीय कार्यालयांनीही विशेष शोध मोहीम राबवावी ग्रामीण भागातील कनेक्शनधारकांकडे अनधिकृत जोडणी आढळल्यास २५ हजार रुपयांचा दंड आकाराणी करावी. तसेच मीटर रिडरांच्या बदल्या करून त्यांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिक्षक नियुक्त करावे असेही त्यांनी सांगितले. हलसवडे येथे प्रस्तावित डॉग शेल्टरच्या कामासाठी कार्यादेश देऊन तातडीने काम सुरू करावीत. शहरातील पार्किंग व्यवस्था, अनधिकृत हातगाड्या व केबिन्स यांच्याविरोधातील कारवाई सातत्याने सुरू ठेवावी.

 करवसुलीचा व इतर विभागांच्या वसुलीचा आढावा विभागीय कार्यालय स्तरावर दर आठवड्याला घ्यावा. मटण मार्केट प्रमाणे इतर बाजारपेठांतील गाळेधारकांनी एकरकमी थकबाकी भरल्यास त्यांच्याशी मुदतवाढीचे करार करण्याबाबत कार्यवाही करण्यास सांगण्यात आले. परवाना न घेता सुरू असलेली दुकाने सील करण्याची कारवाई करावेत असेही त्यांनी आदेश दिले. अतिरिक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उप-आयुक्त परितोष कंकाळ, किरणकुमार धनवाडे, सहाय्यक आयुक्त जयंत जावडेकर, उज्वला शिंदे, स्वाती दुधाणे, डॉ.विजय पाटील, राम काटकर, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, लेखा व वित्त अधिकारी राजश्री पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनील बिद्री, आरोग्याधिकारी डॉ.प्रकाश पावरा, उपशहर अभियंता महादेव फुलारी, सुरेश पाटील, निवास पोवार, अरुणकुमार गवळी, सहा.अभियंता नारायण पुजारी, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, रवका अधिकारी प्रशांत पंडत, विधी अधिकारी संदीप तायडे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, परवाना अधिक्षक अशोक यादव, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंह रजपूत, इस्टेट ऑफिसर शेखर साळोखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, आस्थापना अधिक्षक सौ.प्राजक्ता चौगुले उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes