Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरणवारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजराकोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाई

जाहिरात

 

शाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !

schedule22 Jun 26 person by visibility 28 categoryसामाजिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य हे सर्वव्यापी होते. त्यांच्या विचारकार्यांचा वारसा पुढे चालविणे ही साऱ्यांची जबाबदारे आहे. ते बहुजन विचारांचे नायक तर विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ होते.असा सूर राजर्षी शाहू राष्ट्रीय विचार परिषदेत उमटला.

येथील राजर्षी शाहू सलोखा मंचतर्फे परिषदेचे आयोजन केले होते. शाहू स्मारक भवन येथे हा कार्यक्रम झाला. या परिषदेला उत्तरप्रदेशमधील कानपूर येथील कैलास पटेल उपस्थित होते. त्यांनी उत्तर प्रदेशमधील कुर्मी समाज व कोल्हापूरचे शेकडो वर्षापासून संबध आहेत. राजर्षी शाहू महाराजांचा राज्याभिषेक व कुर्मी समाजाची स्थापना १८९४ मध्ये झाल्याचे त्यांनी सांगितले. कानपूरचे जे. एन. कटियार व राजेश कुमार यांनी ’राजर्षी शाहू महाराज यांचे विचार कार्य हे संपूर्ण समाजाला प्रेरणा देणारे आहे. त्यांचा बहुजन समाजाच्या विकासाचा विचार साऱ्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे.’ गोंडा येथील नंदकुमार वर्मा यांनी भाषणात राजर्षी शाहू कार्याला उजाळा दिला. धारवाड येथील डॉ. माधुरी चौगुले यांनी राजर्षी शाहू महाराज यांच्या शैक्षणिक कार्याचे महत्व विषद केले.

इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी शाहू कार्यावर विवेचन केले. उत्तर प्रदेशात शाहू कार्याचा प्रचार व प्रसार ही झपाटयाने झाला. शाहू महाराज जितके उत्तर प्रदेशला कळाले, तितके ते कोल्हापूरकरांना कळाले नाहीत असे मत सावंत यांनी व्यक्त केले. परिषदेचे निमंत्रक वसंतराव मुळीक यांनी परिषद आयोजनामागील उद्देश सांगितला. परिषदेचे सहनिमंत्रक बबनराव रानगे यांनी सूत्रसंचालन केले. संजय कांबळे यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes