गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाई
schedule21 Jun 26 person by visibility 145 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : तावडे हौटेल गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामाविरोधात महापालिका अॅक्शन मोडवर आली आहे. महापालिका प्रशासनाने, सोमवारी, २२ जून २०२६ पासून अनाधिकृत बांधकामावर कारवाई करणार आहे. सकाळी सहा वाजता तावडे हॉटेल येथे अधिकारी आणि कर्मचारी एकत्र येणार आहेत. त्यानंतर कारवाईला सुरुवात होणार आहे. मोहिमेच्या पूर्वसंध्येला महापालिका प्रशासनाने या परिसरातील अनधिकृत फलक हटविले आहेत. सरस्वती साडी डेपोजवळील तीन होर्डिंग्ज काढले. महापालिका आयुक्त राजेद्र भारुड, अतिरिक्त् आयुक्त रविकांत आडसूळ यांनी अधिकाऱ्यांसह या भागाची पाहणी केली. तसेच आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामचा विषय गाजत आहे. सुप्रीम कोर्टाने ही जमीन महापालिकेच्या मालकीचा असल्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने कारवाईचा निर्णय घेतला आहे.
.दरम्यान आज महापालिकेचे आयुक्त भारुड यांनी गांधीनगर परिसरातील विनापरवाना मिळकतींची संबंधित अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. विनापरवाना बांधकाम व व्यवसाय करणाऱ्या संबंधित मालकांना तात्काळ आपल्या दुकानातील साहित्य हलविण्याच्या सूचना दिल्या.
महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या कारवाई नुसार एकूण 204 प्रकरणांपैकी 177 प्रकरणांमध्ये न्यायालयाची स्थगिती असून ती 25 जूनपर्यंत लागू आहे. उर्वरित 27 प्रकरणांपैकी स्थगिती नसलेल्या निवासी बांधकामांना वगळून व्यावसायिक मिळकतींवर कारवाई करण्यात येणार आहे.
या पाहणीवेळी उपआयुक्त किरणकुमार धनवाडे, सहायक संचालक नगररचना प्रशांत भोसले, सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे, डॉ. विजय पाटील, राम काटकर, शहर अभियंता रमेश मस्कर, उपशहर अभियंता निवास पोवार, अरुण गवळी, उपशहर रचनाकार एन. एस. पाटील, कनिष्ठ अभियंता पदमल पाटील, प्रमोद बराले, चेतन आरमाळ, इस्टेट ऑफिसर शेखर साळोंखे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, वर्कशॉप प्रमुख संजय भोसले, विद्युत अभियंता नारायण पुजारी, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, सर्व्हेअर दत्ता पारधी व खुशालचंद राजमाने उपस्थित होते.
सोमवारी सकाळी सहा वाजल्यापासून गांधीनगर परिसरातील महापालिकेच्या हद्दीतील विनापरवाना व्यावसायिक बांधकामांवर निष्कासन मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी महापालिकेच्या तीन स्वतंत्र पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक पथकामध्ये सहाय्यक आयुक्त, उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, पंचनाम्यासाठी घरफाळा लिपिक व सर्व्हेअर यांचा समावेश करण्यात आला आहे.कारवाईदरम्यान विद्युत, पाणीपुरवठा, वर्कशॉप, इस्टेट, अतिक्रमण, घरफाळा, नगररचना व विधी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. मोहिमेसाठी एक पोकलँड, तीन जेसीबी, तीन डंपर, तीन गॅस कटर-वेल्डर संच तसेच तीन अतिक्रमण डंपर यांसह आवश्यक यंत्रसामग्रीची व्यवस्था केली आहे.