Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरणवारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजराकोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाई

जाहिरात

 

वारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

schedule22 Jun 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : वारणा विद्यापीठात ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन  उत्साहात आणि सामूहिक सहभागातून साजरा करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू  डी. टी. शिर्के यांच्या हस्ते रोपाला पाणी घालून कार्यक्रमाला सुरुवात झाली. उपस्थितांनी सूक्ष्म व्यायाम, सूर्यनमस्कार, विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान करून  योगाची अनुभूती घेतली.   योगामुळे शारीरिक आरोग्य सुदृढ राहण्याबरोबरच मानसिक शांतता, एकाग्रता आणि सकारात्मकता वाढण्यास मदत होते, असा संदेश प्रात्यक्षिकांच्या वेळी मार्गदर्शकांकडून देण्यात आला.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना कुलगुरू शिर्के यांनी  योगासने, प्राणायाम व ध्यान करणे शारीरिक मानसिक संतुलनासाठी अत्यावश्यक आहे हे स्पष्ट करताना उपस्थित विद्यार्थ्यांनी दररोज   योग साधना  करावी असे  आवाहन केले.   आजच्या गतिमान जीवनशैलीत वेळ काढून नियमित  योगासने केलीत निरोगी व आनंददायी जीवन  जगता येते. शैक्षणिक जीवनात यशस्वी होण्यासाठी योग किती महत्त्वाचा आहे हे त्यांनी स्पष्ट केले. या उपक्रमास विद्यापीठाचे अग्रणी महाविद्यालय तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी,  घटक महाविद्यालये, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय तसेच तात्यासाहेब कोरे कॉलेज ऑफ फार्मसी येथील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग होता.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes