Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
महापालिकेचा वॉच अनधिकृत पाणी कनेक्शनवर, मीटर रीडरांच्या बदल्या होणारराज्य गुणवंत कामगार असोसिएशनतर्फे २८ जूनला पुरस्कार वितरणवारणा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय योग दिन साजराकोल्हापूरसाठी हवे विशेष पॅकेज, राजेश क्षीरसागरांची अमित शहांच्याकडे मागणीजिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिनश्री आंनदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनीअरींगच्या डिप्लोमा विभागाचा निकाल 93 टक्केगांधीनगर परिसरातील अनधिकृत बांधकामावर जेसीबी, बांधकामे पाडण्यास सुरुवात कोल्हापूर फर्स्टतर्फे गृहमंत्र्यांना निवेदन, ईएसआय मेडिकल कॉलेजची मागणीशाहू महाराज हे बहुजन विचारांचे नायक! विषमतावादी विचारांचे कर्दनकाळ ! !गांधीनगर परिसरातील अनाधिकृत बांधकामावर उद्यापासून कारवाई

जाहिरात

 

जिल्ह्यात एक लाखाहून अधिक एकल महिला, त्यांच्या सक्षमीकरणाला जिपकडून प्राधान्य – सीईओ डॉ. जॅसमिन

schedule22 Jun 26 person by visibility 65 categoryजिल्हा परिषद

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे एक लाख आठ हजार इतक्या एकल महिला आहेत. त्यांच्या सक्षमीकरणाला जिल्हा परिषद प्राधान्य देईल अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.जसमिन यांनी दिली .
 जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती सभागृहात सोमवारी, २२ जून रोजी,एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष शिल्पा खोत, महिला बालकल्याण विभागाच्या सभापती विद्या पाटील, बांधकाम समिती सभापती सारिका नांदेकर, जिल्हा परिषद सदस्या वर्षा सावर्डेकर, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा कार्यक्रम अधिकारी नितीन मस्के,आलोक अग्रहरी, एस एस दाडे ,आदी उपस्थित होते .
      मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणाल्या, एकल महिलांच्या समस्यांवर साधक - बाधक चर्चा करून उपाययोजना शोधण्याच्या अनुषंगाने आजच्या या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.एकल महिला धोरणाच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण कामकाज हे राज्याला पथदर्शी होईल असा आशावाद व्यक्त केला. महिला व बालकल्याण  विभागाच्या सभापती पाटील श्रीमती विद्या पाटील म्हणाल्या महिला एकल महिलांना आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यास त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास निश्चितपणाने मदत होईल. नितीन मस्के यांनी या कार्यशाळे पाठीमागील भूमिका विषद करताना एकल महिलांना येणाऱ्या अनुभवांचा उहापोह केला .

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes