Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महापालिकेकडून प्रभाग रचना जाहीर ! एक ते १९ प्रभाग चार सदस्यीय, वीस क्रमांकाच्या प्रभागात पाच नगरसेवक !!माजी सैनिक पत्नीसह गिरविणार दूरशिक्षणाचे धडे संयुक्त न्यू शाहूपुरीतर्फे एकत्रित मिरवणूकअमल महाडिकांनी केली पाचगाव केंद्र शाळेची पाहणीओबीसी आरक्षणातील घुसखोरी थांबवा, कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यासमोर आंदोलनकसबा बीड महिला महाविद्यालयात राष्ट्रीय क्रीडा दिन साजराआरोग्य विभागाशी निगडित दोन मंत्री कोल्हापूरचे, एनएचएमचे कर्मचारी समायोजनासाठी दहा दिवस रस्त्यावरगणेशोत्सवातील कामांना शिक्षकांचा विरोध, सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल कोल्हापुरात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनाचाच जयजयकार, साडेतीन लाखाहून अधिक मूर्ती संकलितसाऊंड सिस्टीम-लेझर लाईटला फाटा देणाऱ्या खंडोबा तालीम मंडळाचा सत्कार   

जाहिरात

 

केआयटीत विशेष इंडक्शनने प्रथम वर्षाला प्रारंभ

schedule31 Aug 25 person by visibility 126 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : येथील केआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रथम वर्ष विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्षेत्राची सुरुवात ‘विशेष इंडक्शन’ ने झाली.५ दिवसीय विशेष मार्गदर्शन सत्राचे (इंडक्शन सेशन ) उद्घाटन संस्थेचे संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. 

या विशेष सत्राच्या आयोजनात संस्थेचे अध्यक्ष  साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव  दीपक चौगुले,अन्य विश्वस्तांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या अभियांत्रिकीच्या शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. संचालक डॉ. वनरोटी यांनी केआयटी ची संस्कृती, कामाची पद्धत, पारदर्शकता,शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी तंत्रज्ञानाचा केलेला वापर तसेच केआयटी च्या माजी विद्यार्थ्यांच्या विविध ‘माईल स्टोन’ ची नवीन विद्यार्थ्यांना माहिती दिली. केआयटीचा परिसर हा इको फ्रेंडली असून तो अभ्यासासाठी अत्यंत पूरक आहे त्यामुळे या परिसराची काळजी घेणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. भविष्यात आपल्या स्वप्नपूर्ती मध्ये केआयटी भक्कमपणे सहकार्य करेल असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ.आसिफ कुरेशी यांनी विभागातील रचनेबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. याप्रसंगी रजिस्ट्रार डॉ.डी.जे. साठे, संस्थेचे शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. अक्षय थोरवत, विद्यार्थी उपक्रम अधिष्ठाता डॉ.जितेंद्र भाट उपस्थित होते. कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अभिजीत उळागड्डे यांनी  स्वागत केले. प्रा. शुभदा सावरखांडे यांनी सूत्रसंचालन केले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes