आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलन
schedule17 Oct 26 person by visibility 37 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठरावधारकांना शपथ देण्याच्या प्रकारावरून सुरू झालेला वाद आता आदमापूरपर्यंत पोहोचला आहे. ठरावधारकांना, रविवारी सकाळी आठ वाजता आदमापूर येथील बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर शपथ घेण्यात असल्याचे वृत्त आहे. या प्रकाराला विरोध दर्शवत अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आदमापूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून ठरावधारकांना कर्नाटकातील सौंदत्ती येथील यल्लम्मा देवीच्या मंदिरात शपथ दिल्याचे व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. या प्रकारावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनीही शपथ देण्याच्या प्रकारावर प्रश्न उपस्थित करत ठरावधारकांवरील अविश्वासाबाबत टीका केली होती.दरम्यान आदमापूर येथे शपथ घेण्यात येणार असल्याने हा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुकीसारख्या लोकशाही प्रक्रियेत शपथा घेण्याच्या प्रकाराला विरोध करत अंधश्रद्धा निर्मूलन समिती आंदोलन करणार आहे.