Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डड

जाहिरात

 

कौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाड

schedule17 Oct 26 person by visibility 127 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगोत्री पोहोचविण्यात साळुंखे परिवाराचे मोठे योगदान आहे. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या विचारकार्यानुसार व विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या संस्कारानुसार शिक्षण क्षेत्रात कार्यरत पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ मुरलीधर गावडे यांना शिक्षक मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यासह पुणे विभागीय पदवीधर मतदारसंघातील उमेदवार डॉ. स्मिता योगेश जाधव यांना पहिल्या पसंतीचे मत देऊन पहिल्या फेरीत विजयी करू या.’असा निर्धार शिक्षकांच्या मेळाव्यात करण्यात आला.

महायुतीचे पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील उमेदवार कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता जाधव यांच्या प्रचारार्थ कोल्हापुरात शनिवारी १७ ऑक्टोबर २०२६ मेळावा आयोजित केला होता. माजी खासदार सुजय विखे पाटील, शिक्षक नेते दादासाहेब लाड, माजी आमदार भगवानराव साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अभयकुमार साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा झाला. डॉ. बापूजी साळुंखे स्मृतिभवन येथे हा मेळावा झाला.

शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले,‘ महायुतीचे पुणे शिक्षक मतदारसंघातील उमेदवार गावडे व पदवीधरच्या उमेदवार डॉ.जाधव या तरुण, अभ्यासू उमेदवार आहेत. त्या दोघांनाही विजयी करण्याचा संकल्प आज करू या. शिक्षक मतदारसंघातील उमेदवार गावडे यांना शिक्षकांचा वाढता पाठिंबा मिळत आहे. तो प्रतिसाद पाहून विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. म्हणून काही मंडळी खोटी पत्रके काढली आहेत. मात्र अशा मंडळींना, शिक्षक मतदारांनी कोजिमाशि पतसंस्थेच्या निवडणुकीत धडा शिकवला.पंधराशेहून अधिक मताधिक्क्यांनी शिक्षक स्वाभिमानी आघाडीला विजयी केले. त्याच विजयाची पुनरावर्ती  शिक्षक व पदवीधर मतदारसंघात करू या. गावडे हे तरुण, धडाडीचे आहेत. स्वच्छ चारित्र्याचे आहेत. त्यांना शैक्षणिक वारसा लाभला आहे.’

  माजी खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, ‘कर्मवीर भाऊराव पाटील, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे, पद्मश्री बाळासाहेब विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील शिक्षणाला बळकटी दिली. उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण केल्या. बापूजींचे विचार व प्राचार्य अभयकुमार साळुंखे यांच्या संस्काराच्या मुशीत कौस्तुभ गावडेंची जडणघडण झाली आहे. कौस्तुभ गावडे व डॉ. स्मिता जाधव हे अभ्यासूवृत्तीचे आहेत. प्रभावीपणे प्रश्न मांडू शकतात. शिक्षक व पदवीधरांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीला चालना देण्यासाठी महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांना विजयी करा.’ कार्याध्यक्ष साळुंखे यांनीही पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन केले.

याप्रसंगी माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी कौस्तुभ गावडेंना पाठिंबा दिल्याचे  जाहीर केले. व्याख्याते प्रा. मधुकर पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी चेअरमन सुरेश संकपाळ, शिक्षक संजय डवर यांची भाषणे झाली. प्राचार्य दत्तात्रय घुगरे यांनी आभार मानले. मेळाव्याला विवेकानंद शिक्षण संस्थेचे कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे, प्राचार्य मिलिंद हुजरे, प्राचार्य श्रृती जोशी, शाळा कृती समितीचे बाबा पाटील, टीडीएफचे बी.एस. खामकर, सुरेश खोत, संजय चोरमारे, जयसिंग देवकर, दत्ता पाटील, कोजिमाशिचे चेअरमन श्रीकातं पाटील, बाळ डेळेकर नंदुकमार कांबळे, शिवराज पाटील, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक सागर बगाडे, संदीप पाटील, एम आर पाटील, दीपक पाटील, मनोहर पाटील, अशोक हुबळे, शिवाजी कोरवी, माजिद पटेल, एम एन पाटील, मदन निकम, आनंदा चव्हाण, अनिल चव्हाण आदी उपस्थित होते.

………

युवा लढणार…इतिहास घडणार

 प्रचार मेळाव्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिक्षकांनी हात उंचावून घोषणा दिल्या.‘युवा लढणार…इतिहास घडणार ! आपला माणूस…हक्काचा माणूस कौस्तुभ गावडे ! !’अशा घोषणा दिल्या. याप्रसंगी आदिवासी शिक्षक संघटनेने शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. संघटनेचे रोहिदास गावीत, अनीस वसावे, जगदीश गावीत, जगन गावीत, शिवा वळवी यांनी पाठिंब्याचे पत्र कार्याध्यक्ष साळुंखे यांच्याकडे दिले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes