Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डड

जाहिरात

 

महाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळे

schedule17 Oct 26 person by visibility 43 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर -: ‘पुणे विभागीय शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. जयंत आसगावकर व हर्षदा देशमुख -जाधव हे अभ्यासू आणि कर्तृत्ववान आहेत. या दोन्ही निवडणुका महाविकास आघाडी ताकतीने लढवत आहे. या निवडणुका जिंकू ही. प्रत्येकजण पास होण्यासाठी लढत असतो, या निवडणुकीतही आम्ही पास होऊ.’असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या व खासदार सु्प्रिया सुळे यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ खासदार सुळे या शुक्रवारी, कोल्हापुरात होत्या. त्यांनी, कार्यकर्त्याच्यासोबत आढावा बैठक घेतली. शेतकऱ्यांशी निगडीत विषय सरकार गांभीर्य घेत नाही. शक्तीपीठ माहामार्गसाठी एक लाख कोटी  रुपये खर्च आहेत, मात्र कष्टकरी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत. अशी टीकाही त्यांनी केली. पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, माजी आमदार राजीव आवळे, शारंग पाटील, अश्विनी माने, पद्मा तिवले, रोहित पाटील आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes