Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या गौरवार्थ विद्यापीठात आंतरराष्ट्रीय परिषदकारखानदारांची उद्योगमंत्र्यांसोबत भेट ! उद्यमनगरात एफएसआय वाढ, गोकुळ शिरगावमध्ये फायर ब्रिगेड स्टेशन, स्मॅक परिसरातील कचरा डेपो हलविणार !!वारणा विद्यापीठाचे पहिले कुलाधिकारी एन एच पाटील पोटनियम दुरुस्तीला मंजुरी, गोकुळचे संचालक २५ होणार ! संघातर्फे आईस्क्रीम-बासुंदीचे उत्पादन, वासाच्या दूध खरेदीदरात दुप्पट वाढ!!एसएनडीटीचा प्रादेशिक युवा महोत्सव यंदा वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयातसरकारी शिष्यवृत्ती जिल्हानिहाय्य गुणवत्ताधारक विद्यार्थी कोटा संख्या वाढवा :इंग्रजी माध्यमातील शाळांनी गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी प्रयत्न करावेत-पालकमंत्री प्रकाश आबिटकरजिल्हा बँकेकडून शेतकरी, विद्यार्थी, महिला सक्षमीकरणासाठी योजनांची खैरात ! इंडस्ट्रीजलाही अर्थ पुरवठा !!गोकुळमार्फत यंदा युवा दूध उत्पादक वर्ष ! युवकांना दुग्ध व्यवसायातून उत्पन्नाच्या नवीन संधी ! हॉकी स्टेडियम जवळील जागेवर मराठा भवन उभारा-आमदार सतेज पाटील

जाहिरात

 

जज बब

schedule09 Aug 25 person by visibility 116 category

कर महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर करवीर निवासिनी अंबाबाई देवीची मूर्ती सुस्थितीत राहावी म्हणून अकरा व बारा ऑगस्ट 2025 या दोन दिवसाच्या कालावधीत मूर्तीची पाहणी व आवश्यक नेहमीच संवर्धन प्रक्रिया करण्यात येणार आहे यामुळे या दोन दिवसाच्या कालावधी कालावधीत भाविकांना अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही या कालावधीमध्ये भाविकांना श्रीची उत्सव मूर्ती व श्री कलश दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहेत भाविकांनी पितळी उंबराच्या बाहेरून श्री कलश व श्रीच्या उत्सव मूर्तीचे दर्शन घेऊन सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडे यांनी केले आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्यावतीने मूर्तीची पाहणी व संवर्धन प्रक्रिया होणार आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या वतीने ही नियमित संवर्धन प्रक्रिया होणार आहे असे देवस्थान समितीने म्हटले आहे

मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मान्यता

schedule29 May 25 person by visibility 442 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर :  बहुप्रतिक्षित मिरज ते कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुपदरीकरणाच्या मागणीला यश आले आहे. सुमारे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण व्हावे, यासाठी सर्व्हेक्षण करण्यास केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. त्यामुळे कोल्हापूर-मिरज रेल्वे मार्गाचे लवकरच दुपदरीकरण होईल आणि अनेक नव्या गाडया कोल्हापुरातून सुरू होतील, यासाठी आणखी एक पाऊल उचलले गेले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने या विषयाचा पाठपुरावा केला होता. त्याबद्दल रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे खासदार महाडिक यांचे अभिनंदन करण्यात आले आहे.
कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्ग एकेरी असल्याने गाडयांचे क्रॉसिंग, रेल्वे गाडयांची संख्या आणि फ्रिक्वेन्सी वाढवण्यावर मर्यादा आहेत. त्यामुळे ४७ किलोमीटरच्या मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.  त्याचा परिपाक म्हणून केंद्र सरकारने मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्व्हेक्षण करण्यास मंजूरी दिली आहे. त्यातून एकप्रकारे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण होणार, याचे संकेत मिळाले आहेत. वंदे भारतसह नव्या रेल्वे गाडया कोल्हापुरातून सुरू करण्यासाठी दुपदरीकरण होणे अत्यावश्यक आहे. सर्व्हेक्षण झाल्यानंतर लवकरच दुपदरीकरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, असा विश्‍वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला आहे. 

छछ झज

schedule18 Dec 24 person by visibility 849 category

 

 जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा स्तरीय खातेप्रमुख आणि  जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकारी आणि तालुका स्तरीय खातेप्रमुख यांची समन्वय सभा paar पडली. या सभेला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सकाळी दहा वाजल्यापासून उपस्थित राहून आढवा घेतला व मार्गदर्शन केले. आज दिवसभरात विकासात्मक प्रशासन आणि तालुका स्तरीय यंत्रणेची विविध योजनांच्या अंमलबावणीमध्ये असणारी भूमिका आणि करावयाची कर्तव्ये या बाबत सखोल चर्चा करण्यात आली. सकाळी 10 वाजले पासून ते संध्याकाळी साडे सात वाजेपर्यंत जवळपास 10 तास बैठक सुरू होती
विविध विभागांछा आढावा घेताना पशू संवर्धन विभागाकडील पशू गणानेचे काम जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये डिसेंबर अखेर सुरू झाले पाहिजे या बाबत गट विकास अधिकारी यांना सुचा देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्रामधून  दिल्या जाणाऱ्या सेवांचा दर्जा उत्कृष्ट ठेवण्याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सतर्क असावे . संस्थात्मक प्रसूती बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी नाराजी व्यक्त केली. स्वच्छ भारत मिशनचा आढावा घेताना वैयक्तिक स्वाचाता गृहाच उद्दिष्ट १००%साध्य होईल याकडे गट विकास अधिकारी यांनी वैयक्तिक लक्ष द्यावे तसेच घान कचरा व्यवस्थापन आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रक्रिये ची सर्व मंजूर कामांचा अहवाल 27 डिसेंबर पर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.घरकुल योजनेच्या सर्व निकषांवर जिल्हा राज्यात अग्रेसर राहील या करिता जाणीवपूर्वक प्रयत्न करावे आणि यामध्ये लाभार्थी व ग्रामपंचायत यंत्रणा यांना सहभागी करण्याच्या सूचना दिल्या. घरकुल पूर्ण करण्याकरिता विशेष मोहीम राबविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या
जल जीवन मिशन मध्ये ज्या गावांना पाणी पुरवठा योजना मंजूर झाल्या आहेत तथापी अद्याप सुरू झाल्या नाहीत त्या गावाच्या पदाधिकाऱ्यांना गत विकास अधिकारी यांनी समक्ष चर्चेला बोलावून कामे सुरू होतील या कडे लक्ष द्यावे अन्यथा या गावाच्या योजनेबाबत गांभीर्यपूर्वक निर्णय घेतला जाईल असा इशाराही दिला. जिल्ह्यातील ज्या कर्मचाऱ्यांची खाते निहाय   चौकशी प्रस्तावित केलेली आहे अथवा ज्यांची खाते निहाय चौकशीची प्रक्रिया सुरू आहे अशी सर्व प्रकरणे गटविकास अधिकाऱ्यांनी स्वतः आढावा घेऊन निकाली निघतील याबाबत दक्षता घ्यावी माननीय विभागीय आयुक्त यांनी त्यांच्या अहवाल वाचनात दिलेल्या सूचनेनुसार गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्याबाबत कोणतेही सहानुभूती न बाळगता त्याच्यावर कारवाईबाबत तात्काळ प्रकिया करण्यात यावी.  ग्रामपंचायत विभागाकडील आढाव्या दरम्यान पंधरावा वित्त आयोगाचा खर्च आराखड्यानुसार पूर्ण करण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिला तसेच तालुकास्तरीय तक्रारींचा त्याच स्तरावर गटविकास अधिकारी यांनी निपटारा  केल्यास जिल्हास्तरावर या तक्रारी येणार नाहीत याबाबत गटविकास अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी अशाही सूचना दिली
जिल्ह्यातील सर्व गट विकास अधिकाऱ्यांचे गुणांकन केले आहे. त्यांच्याकडील एकूण कामकाजाच्या मुद्द्यावर 140 गुणांचे गुणांकन करण्यात आले आहेत. त्यानुसार  राधानगरी  तालुका  86.56 गुनासह  प्रथम क्रमांकावर असून कागल  तालुका 86.45 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे 
 सर्वात कमी गुण  करवीर  तालुक्याला 76.52 आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच अशा पद्धतीने गुणांकन केले असून याच नुसार गट विकास अधिकारी यांच्या कामगिरीचे वार्षिक मूल्यांकन केले जाणार आहे 
सदर बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयान , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष जोशी प्रकल्प संचालक श्रीमती सुषमा देसाई व जिल्हास्तरीय सर्व खाते प्रमुख आणि तालुक्याचे सर्व गटविकास अधिकारी उपस्थित होते
गट विकास अधिकारी यांचे गुणांकन खालील प्रमाणे आहे 
 1) राधानगरी - 86.56
 2) कागल - 86.45
 3) भुदरगड - 86.26
 4) गगनबावडा - 83.78 
5) शिरोळ - 83.27
 6) हातकणंगले - 81.58
  7)शाहूवाडी - 80.96
  8) आजरा - 79
9) करवीर - 76.52
10) चंदगड - 76.66
11) पन्हाळा - 77.68
 12) गडहिंग्लज - 77.94

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes