Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डड

जाहिरात

 

कोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावा

schedule17 Oct 26 person by visibility 60 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी - : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आमदार प्रा. जयंत आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ शुक्रवारी कळंबा येथील अमृतसिद्धी हॉलमध्ये प्रचार मेळावा झाला. या मेळाव्यात दोन्ही उमेदवारांना कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यामधून प्रचंड बहुमताने विजयी करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.       
कोल्हापूर शहर आणि करवीर तालुक्यातील शिक्षक, संस्थाचालक, शिक्षकेतर सेवक, विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी प्रचारासाठी सर्व ताकदीनिशी मैदानात उतरण्याचा निर्धार केला.
  आमदार प्रा. जयंत आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांत शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला असून, शिक्षकांचा हक्काचा आमदार म्हणून त्यांनी विश्वास संपादन केला आहे. शाळांच्या विकासासाठी त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याबरोबरच प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी देऊन विधानपरिषदेत पाठवावे, असे आवाहन मेळाव्यातील वक्त्यांनी केले.
  मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील यांनी शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमदार आसगावकर यांना पुन्हा निवडून देण्याचे आवाहन केले. शिक्षकांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज असल्याचे नमूद केले. शिवाजी मराठा बोर्डिंग   हाऊसचे अध्यक्ष के. जी. पाटील यांनी आमदार आसगावकर यांच्या कामाचा गौरव केला. चार वर्षांपासून रखडलेल्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या कामाला त्यांनी तातडीने गती दिली. मंत्र्यांच्या स्तरावर न सुटलेले प्रश्न अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावले. अशा कार्यक्षम लोकप्रतिनिधीला पुन्हा संधी द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
       शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस. डी. लाड यांनीही आसगावकर यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. शांत, संयमी आणि सुस्वभावी नेतृत्व म्हणून त्यांची ओळख असून, २०२० मध्ये प्रचंड मतांनी निवडून आल्यानंतर त्यांनी या संधीचे सोने केले. शाळांच्या विकासासाठी त्यांनी प्रत्यक्ष शाळांपर्यंत पोहोचून प्रश्न समजून घेतले आणि त्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न केले. गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी काम करणाऱ्या अशा उमेदवाराला पुन्हा निवडून द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. मेळाव्याला मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष रवींद्र मोरे, आर. डी. पाटील, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघटनेचे सचिव संजय मोरे, बी. एस. किल्लेदार, सविता पाटील, शिवाजी मराठा बोर्डिंगचे उपाध्यक्ष डी. जी. किल्लेदार, विनोद उत्तेकर, कोजिमाशी पतपेढीचे चेअरमन उमेश माळी, माजी चेअरमन एम. पी. चौगुले, संचालक शिवाजी लोंढे, जयसिंग पवार, सुदेश जाधव, अशोक मानकर, गजानन काटकर उपस्थित होते.

…………

 प्रचारासाठी एकजुटीने मैदानात उतरणार

 करवीर तालुक्यातून दोन्ही उमेदवारांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. शिक्षक संघटना, संस्थाचालक आणि पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे प्रचाराची जबाबदारी स्वीकारून मतदारांशी संपर्क वाढविण्यावर भर दिला. अनु आसगावकर म्हणाल्या, ‘आमदार आसगावकर यांनी गेल्या सहा वर्षांत 'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' या कार्यपद्धतीने काम केले. शिक्षकांचे प्रश्न सोडविणे हेच ध्येय समोर ठेवून त्यांनी कार्यकाळात सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे त्यांना पुन्हा आमदार करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करावेत.’

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes