Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डड

जाहिरात

 

एआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षित

schedule17 Oct 26 person by visibility 49 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: ‘ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वाढत्या वापरामुळे माहिती सहज उपलब्ध होत असली, तरी सखोल ज्ञान, स्वतंत्र विचारक्षमता, कल्पनाशक्ती आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी वाचन अत्यावश्यक आहे. पुस्तकांच्या वाचनामुळे विचारांना दिशा मिळते, ज्ञानाचा विस्तार होतो आणि चिकित्सक दृष्टिकोन विकसित होतो,’ असे मत डॉ. युवराज दीक्षित यांनी केले.

 वाचन प्रेरणा दिनानिमित्त शहीद सीताराम पाटील लायब्ररीच्या वतीने आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा विवेकपूर्ण वापर करत नियमित वाचनाची सवय जोपासावी, असे आवाहनही त्यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रशांत पालकर होते. यावेळी सर्वाधिक वाचन करणाऱ्या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच सर्वाधिक संशोधन पेपर तयार करणाऱ्या प्रा. स्नेहल कुलकर्णी यांनाही प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. ग्रंथपाल संग्राम किल्लेदार यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी खोत यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. अविनाश पालकर यांनी आभार मानले. यावेळी प्राचार्य हिमांशू चव्हाण, उपप्राचार्य सागर शेटगे ग्रंथपाल दिगंबर कोराणे, तनुजा पाटील उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes