Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
आदमापूरमधील शपथेला अंधश्रद्धा निर्मूलन समिती विरोध करणार, बाळूमामा विद्यालयाच्या मैदानावर आंदोलनकोल्हापूर शहर, करवीरमधून आसगावकरांना प्रचंड मताधिक्य देण्याचा निर्धार! कळंब्यात महाविकास आघाडीचा प्रचार मेळावाकौस्तुभ गावडेंना शिक्षकांचा वाढता प्रतिसाद, विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरलीय - दादासाहेब लाडकौस्तुभ गावडे, स्मिता जाधवांच्या प्रचारासाठी चंद्रकांत पाटील मैदानात ! कोल्हापुरात मतदारांशी थेट संपर्क !!डिजिटल इम्युनिटी उपक्रम टप्प्याटप्प्याने राज्यात राबविणारमहाविकास आघाडीचे पदवीधर – शिक्षकचे उमेदवार कर्तृत्ववान - खासदार सुप्रिया सुळेराज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहनएआयच्या युगात वाचनसंस्कृती जपणे काळाची  गरज : डॉ. युवराज दीक्षितमंत्र्यांचे विधान चर्चेत, खोटं बोललं की देवी अंगावर उठते ! महायुतीचे नेते सौंदत्ती डोंगरावर, ठरावधारकांचा मेळावा अन् यल्लम्मा देवीची शपथ !!छछ डड

जाहिरात

 

राज्य नाट्य स्पर्धेच्या परीक्षणासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

schedule17 Oct 26 person by visibility 42 categoryलाइफस्टाइल

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी  : सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धांना यंदा १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धांमधील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील अनुभवी कलाकारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत हौशी मराठी नाट्य स्पर्धा, हौशी हिंदी नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, मराठी बालनाट्य स्पर्धा, दिव्यांग बालनाट्य स्पर्धा, मराठी एकांकिका स्पर्धा तसेच मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धा आदी विविध राज्यस्तरीय नाट्य स्पर्धांचे दरवर्षी आयोजन करण्यात येते. यंदाच्या राज्य नाट्य स्पर्धेतील नाटकांचे परीक्षण करण्यासाठी नाट्य क्षेत्रातील कलाकारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. इच्छुक कलाकारांना २५ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ऑनलाइन अर्ज तसेच यासंदर्भातील अधिक माहितीसाठी mahanatyaspardha.com या संकेतस्थळाला भेट द्यावी. पात्र व अनुभवी नाट्य कलाकारांनी या संधीचा लाभ घेऊन  मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes