Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
खासदार धैर्यशील मानेंनी साजरी केली वाडयावस्तीवरील लोकांसोबत दिवाळीजिल्हा परिषदेच्या शाळेतील तीन मुख्याध्यापक शिक्षण- क्रीडा समितीवर सदस्ययशवंत ब्रिगेड-कोळेकर परिवाराची दिपावलीत सामाजिक बांधिलकी आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटीलगोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादकांना मिळावा मतदानाचा अधिकार - राजू मानेगोकुळच्या चेअरमनपदी राजेश पाटील ! महायुतीचा सतेज पाटलांना धक्का, शशिकांत पाटील पराभूत !!अध्यक्ष निवडीच्या सभेसाठी समविचारी- महायुतीचे संचालक गोकुळमध्ये दाखलअध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !गोकुळ अध्यक्ष निवडीत मोठा ट्विस्ट, स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार ! खंडपीठाचा निर्णय, सत्तेसाठी महायुती सरसावली!!मी समोरून लढणारा माणूस, तुमच्यासारखा पाठीत खंजीर खुपसत नाही - सतेज पाटलांचा हसन मुश्रीफांच्यावर हल्लाबोल

जाहिरात

 

आधार प्रमाणीकरण नसलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धारावेत – प्रसाद पाटील

schedule11 Nov 26 person by visibility 182 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी -: युडायस प्रणालीमध्ये तांत्रिक कारणांमुळे आधार प्रमाणीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांची गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत ऑफलाइन पडताळणी करून सदर विद्यार्थी ग्राह्य मानावी. २०२६-२७ ची संच मान्यता करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने सरकारकडे केली आहे.

मागील वर्षी संचमान्यता करताना ज्या विद्यार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले नव्हते, अशा विद्यार्थ्यांना संचमान्यतेसाठी ग्राह्य न धरता शिक्षक पदांची निश्चिती करण्यात आली होती. परिणामी, प्रत्यक्ष शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी दर्शविली गेल्याने अनेक शाळेतील शिक्षक पदे कमी मंजूर झाली. वास्तविक पाहता, आधार प्रमाणीकरण न होणे ही अनेक वेळा पूर्णतः तांत्रिक अथवा प्रशासकीय स्वरूपाची अडचण असते. विशेषतः इयत्ता पहिली व दुसरीतील लहान विद्यार्थ्यांच्या हातांच्या बोटांचे ठसे स्पष्ट उमटत नसल्यामुळे आधार प्रमाणीकरणात अडचणी निर्माण होतात. तसेच नाव, जन्मतारीख, इतर तपशीलांमधील किरकोळ तफावत किंवा तांत्रिक कारणांमुळे आधार नोंदी प्रमाणित होत नाहीत. अशा विद्यार्थ्यांचे प्रत्यक्ष शाळेत नियमित शिक्षण सुरू असून, त्यांना शासनाच्या विविध शैक्षणिक योजनांचा लाभ दिला जातो. यामध्ये मोफत गणवेश, पाठ्यपुस्तके, प्रधानमंत्री पोषण शक्ती योजना इत्यादी योजनांचा समावेश आहे. त्यांना संच मान्यतेत डावलणे हा त्यांच्यावर अन्याय आहे.
……………

तांत्रिक अडचणीचा फटका विद्यार्यांना का?
 ‘आधार प्रमाणीकरण ही बाब पूर्णतः तांत्रिक असून या तांत्रिक अडचणीमुळे प्रत्यक्ष विद्यार्थी शाळेत असूनही त्यांचे शिक्षक पद कमी होते. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रगतीवर होतो. आशा विद्यार्थ्यांची गटशिक्षणाधिकारी यांचे मार्फत पडताळणी करून सदर विद्यार्थी संच मान्यतेसाठी ग्राह्य धरणे न्यायसंगत होईल.’
- प्रसाद पाटील, राज्याध्यक्ष - महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes