अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध अजित नरकेंचे नाव आघाडीवर !
schedule09 Nov 26 person by visibility 532 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी समविचारी आघाडीकडून शशिकांत पाटील चुयेकर विरुद्ध महायुतीचे संचालक अजित नरके अशी लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत महायुतीच्या नेतेमंडळींची सोमवारी सायंकाळी बैठक झाली. शिवसेनेचे संचालक अजित नरके यांचे नाव आदेश पदासाठी आघाडीवर होते. महायुतीकडून चंदगडचे माजी आमदार व गोकुळचे संचालक राजेश पाटील, दिवंगत आमदार पी एन पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील, शिवसेनेचे आमदार चंद्रदीप नरके यांचे बंधू व गोकुळचे संचालक अजित नरके आणि माजी आमदार के पी पाटील यांचे चिरंजीव रणजीत पाटील यांची नावे चर्चेत आहेत.गोकुळमध्ये 25 संचालकांच्या जागा आहेत तर शासनाने नियुक्त केलेल्या चार संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे.
गोकुळच्या अध्यक्षपदावरून गेले काही दिवस महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे. 29 ऑक्टोबर रोजी अध्यक्षपदाच्या निवडीसाठी झालेली संचालक मंडळाची पहिली सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. अध्यक्षपद निवडीच्या सभेसाठी चौदा संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे. समविचारी आघाडीचे नेते सतेज पाटील यांनी दूध उत्पादकाना आम्हाला बहुमताचा कौल दिला आहे तेव्हा अध्यक्षपद समविचारी आघाडीला मिळावे अशी मागणी केली. दरम्यान महायुती आणि समविचारी विचारी आघाडीत गोकुळ वर सत्ता कोणाची यावरून राजकीय संघर्ष रंगला. म अध्यक्षपद निवडीच्या सभेला 14 संचालकांची उपस्थिती आवश्यक आहे हा मुद्दा पुढे आला. प्रकरण कोर्टापर्यंत गेले.दरम्यान सरकारने ज्या सहकारी संस्थांची वार्षिक उलाढाल 500 कोटीवर आहे तेथे पाच संचालक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामध्ये चार शासकीय नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. सरकारच्या या निर्णयावर विरोधात समविचारी आघाडीने कोर्टात याचिका दाखल केली.
कोर्टाने सोमवारी शासन नियुक्त चार संचालकांना मतदानाचा अधिकार दिला आहे. तसेच हे चार संचालक मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या सभेला उपस्थित राहणार आहेत त्यामुळे महायुतीचे पारडे जड मानले जात आहे दरम्यान महायुतीकडून अध्यक्ष पदासाठी चेतन नरके की अजित नरके यावर चर्चा सुरू होती. अखेर अजित नरके यांचे नाव अध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी निश्चित केल्याचे वृत्त आहे. मंगळवारी 10 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता गोकुळ शिरगाव येथील गोकुळ दूध प्रकल्प कार्यालयात अध्यक्ष पदासाठी संचालक मंडळाचे सभा होत आहे. तर महाविकास आघाडी शशिकांत पाटील चुयेकर यांना अध्यक्ष करण्यासाठी प्रयत्नशील आहे.